शेततळ्यामुळे पाणीटंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:18 AM2021-02-06T05:18:41+5:302021-02-06T05:18:41+5:30

---- उमा नदीवरील पुलाची दुरवस्था काजळेश्वर: खेर्डा ते काजळेश्वर मार्गावरील उमा नदीवरील पुलाचे कठडे तुटले आहेत. यामुळे एखाद्या वेळी ...

Overcoming water scarcity due to farms | शेततळ्यामुळे पाणीटंचाईवर मात

शेततळ्यामुळे पाणीटंचाईवर मात

googlenewsNext

----

उमा नदीवरील पुलाची दुरवस्था

काजळेश्वर: खेर्डा ते काजळेश्वर मार्गावरील उमा नदीवरील पुलाचे कठडे तुटले आहेत. यामुळे एखाद्या वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्यास वाहन नदीत पडून अपघाताची भीती आहे. त्यामुळे पूल दुरुस्तीची मागणी आहे.

------

प्रकल्पाची पातळी निम्म्यावर

वाशिम : यंदा वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा कोठारी परिसरात पडला. यामुळे सिंगडोह आणि डोंगर खेडा येथील लघू प्रकल्प तुडुंब भरले होते; परंतु रब्बीचे क्षेत्र वाढल्याने प्रकल्पातून मोठा उपसा झाल्याने या प्रकल्पातील पातळी निम्म्याच्या खाली आली आहे.

----

दोन सापांना जीवदान

वाशिम: निसर्ग स्पर्श फाउंडेशनच्या सदस्यांनी गुरुवारी विविध ठिकाणी आढळून आलेल्या दोन सापांना सुरक्षीतपणे पकडून जीवदान दिले. त्यात मानोरा तालुक्यातील अभयखेडा आणि मंगरुळपीर शहरात आढळून आलेल्या कवड्या सापाचा समावेश आहे.

------

पोलिसांकडून वाहनांची तपासणी

धनज बु.: धनजमार्गे परजिल्ह्यातून कारंजा तालुक्यात येणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. या अंतर्गत ढंगारखेड चेकपोस्टवर गुरुवारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली.

--------

रस्त्याचे काम रखडले

देपूळ: परिसरातील जुन्या पाणंद रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री योजनेतून या रस्त्याचे काम करण्याची मागणी पाणगव्हा येथील शेतकर व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार केली, परंतु त्याची दखल न घेतल्याने याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्याची तयारी केली आहे.

Web Title: Overcoming water scarcity due to farms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.