जादा भारनियमनाने नागरिक त्रस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 07:40 PM2017-10-13T19:40:39+5:302017-10-13T19:41:28+5:30

आसेगाव पो.स्टे. - मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव पो.स्टे. परिसरातील १५ गावांत जादा भारनियमन सुरू असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत.

Overloaded civilian suffering! | जादा भारनियमनाने नागरिक त्रस्त !

जादा भारनियमनाने नागरिक त्रस्त !

Next
ठळक मुद्दे१४ तासांचे भारनियमन आसेगाव उपकेंद्रातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव पो.स्टे. - मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव पो.स्टे. परिसरातील १५ गावांत जादा भारनियमन सुरू असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत.
आसेगाव येथील ३३ केव्ही विद्युत  उपकेंद्रांतर्गत वारा जहॉगीर फिडरवरून पिंपळगाव, आसेगाव, वारा जहॉगीर, कुंभी, लही, वसंतवाडी तसेच देपूळ व धानोरा फिडरवरून नांदगाव, आसेगावचा काही भाग, धानोरा, शिवणी दलेलपूर, चिंचखेडा, शेगी फिडरवरून चिंचोली, दाभडी, रामगड, शेगी, भडकुंभा आदी गावांत वीजपुरवठा केला जातो. या तिन्ही फिडरवर आता दिवसा ९ आणि रात्री ५ असे एकूण १४ तास भारनियमन घेतले जात आहे. कधी यामध्ये कपातही केली जाते. एकंदरित १० ते १४ तासाचे वीज भारनियमन घेतले जात असल्याने नागरिक वैतागले आहेत. आसेगाव परिसरातील १५ गावांची विद्युतविषयक जबाबदारी पार पाडण्यासाठी केवळ एका लाईनमनची नियुक्ती करण्यात आलेली आहे. १५ गावाची जबाबदारी सांभाळताना एका कर्मचाºयावरच जादा भार येत असल्याने तांत्रिक बिघाड झाल्यास दुरूस्ती करण्यासाठी प्रचंड विलंब लागतो. कर्मचाºयांची संख्या वाढविणे गरजेचे ठरत आहे.
असे आहे भारनियमन ...!
वारा जहॉगीर फिडर - सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी सकाळी ५ ते दुपारी २ आणि सायंकाळी ६.३० ते रात्री ११.३० तसेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ४ आणि रात्री ७ ते १२ या वेळेत भारनियमन घेतले जाते.
धानोरा व शेगी फिडर - सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ४ आणि रात्री ७ ते १२ या वेळेत तसेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशी सकाळी ५ ते दुपारी २ आणि सायंकाळी ६.३० ते रात्री ११.३० या वेळेत भारनियमन घेतले जाते.

Web Title: Overloaded civilian suffering!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.