परदेशात गाडी चालविण्याच्या परवान्याचेही होऊ शकते नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:46 AM2021-08-28T04:46:08+5:302021-08-28T04:46:08+5:30
इन्फो : असा काढावा आंतराष्ट्रीय परवाना - परदेशात वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी आरटीओ नियमानुसार ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात ...
इन्फो :
असा काढावा आंतराष्ट्रीय परवाना
- परदेशात वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी आरटीओ नियमानुसार ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर, शुल्कदेखील ऑनलाईनच भरणे गरजेचे आहे. त्यानंतर शुल्क भरल्याची प्रिंट काढून आरटीओ कार्यालयात सादर करावी लागते. आरटीओ कार्यालयाकडे पासपोर्ट, व्हिसा आणि वाहन परवाना दाखवावा लागतो. मात्र, ही कागदपत्रे दाखविण्यासाठी मूळ कागदपत्रे घेऊन जाणे गरजेचे आहे.
- यानंतर आरटीओ कार्यालयाकडून या मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते. त्यानंतर संबंधित नागरिकाला एका वर्षाच्या मुदतीसाठी परवाना देण्यात येत आहे.
- एका वर्षाचा परवाना संपल्यानंतर, पुन्हा नव्याने अर्ज करून हा परवाना काढावा लागतो.
इन्फो :
कोण काढू शकतो हा परवाना
- ज्या नागरिकांकडे परदेशात राहण्याचा व्हिसा व पासपोर्ट आहे, अशा नागरिकांना आंतराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो.
- वाहन परवाना देताना आरटीओ प्रशासनातर्फे संबंधित नागरिकाचे मूळ लायसेन्स पाहूनच पुढील प्रक्रिया केली जाते.
- मूळ वाहन परवान्यावरील पत्ता व पासपोर्टवरील पत्ता हा एकच असणे गरजेचे आहे. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, एका दिवसात हा वाहन परवाना दिला जातो.
इन्फो
आरटीओ कार्यालयातर्फे परदेशात गाडी चालविण्यासाठी परवान्याच्या नूतनीकरणासाठी नवा परवाना काढण्याच्या नियमाप्रमाणे ऑनलाईन अर्ज करावा लागतो. संबंधित नागरिकांकडे अगोदरचे लायसन्स् असल्यामुळे पुन्हा त्यांची कुठलीही परीक्षा घेतली जात नाही. तसेच इतर सर्व साधारण लायसन्स्प्रमाणे नियमानुसार रुपये शुल्क आकारले जाते.
ज्ञानेश्वर हिरडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम
इन्फो :
कोरोनाकाळात संख्या घटली
२०१८ - ४
२०१९ - ४
२०२० - २
२०२१-२