पळून गेलेल्या ८० टक्के अल्पवयीन मुलींचा शाेध लावण्यास पाेलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:42 AM2021-07-28T04:42:56+5:302021-07-28T04:42:56+5:30
२०१८ ते २०२१ ची आकडेवारी पाहता दरवर्षी यामध्ये वाढच झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये अनेक प्रेमप्रकरणांचाच समावेश असल्याचे तपास ...
२०१८ ते २०२१ ची आकडेवारी पाहता दरवर्षी यामध्ये वाढच झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये अनेक प्रेमप्रकरणांचाच समावेश असल्याचे तपास कार्यातून दिसून येते. चालू वर्षातील ६ मुलींचा शाेध पाेलीस विभागाकडून घेतला जात आहे. २०१८ च्या तुलनेत काेराेना काळात २०२० मध्ये मुली पळून जाण्याच्या, बेपत्ता हाेण्याच्या प्रकारांत वाढ झाली असल्याचे पाेलीस दप्तरी नाेंदींवरून दिसून येते.
----------------
मुली चुकतात कुठे?
प्रेमासाठी साेडले घर
प्रेमाच्या माेहात पडून मंगरुळपीर तालुक्यातील एका गावातील प्रेमीयुगुल पुण्याकडे पळून गेले. पाेलिसांनी शाेध घेऊन त्यांना परत आणले. दाेघांची समजूत काढली.
मेट्राे सीटीचे अट्रॅक्शन
वाशिम तालुक्यातील एक मुलगी चित्रपटाप्रमाणे मेट्राे सीटीमध्ये करिअरच्या नावाखाली घर साेडून निघून गेली. काही दिवसांनंतर काही जमले नाही म्हणून गावाकडे परतली.
---------
मुला-मुलीचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून व्हा त्यांचे मित्र!
मुली वयात येत असताना त्यांच्यावर चिडून न जाता त्यांचे मित्र म्हणून त्यांना समजून घेणे गरजेचे असते, असे मानसाेपचार तज्ज्ञ डाॅ. नरेशकुमार इंगळे यांनी सांगितले.
-------
अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटना
२०१८ - ४३
२०१९ - ५९
२०२० - ७०
२०२१ - २२