वाशिम जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे पंचनामे संथगतीने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:50 PM2017-12-20T13:50:53+5:302017-12-20T13:53:24+5:30
वाशीम : राज्य सरकारने बोंडअळीग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले़ या आदेशावरुन कृषी विभागाने जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्यास सुरुवातही केली, पण महिना उलटत आला असतानाही अद्यापपर्यंत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही़
वाशीम : बोंडअळीच्या प्रकोपात जिल्ह्यातील शेतकºयांचे स्वप्न कुरतडल्या गेले़ त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने बोंडअळीग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले़ या आदेशावरुन कृषी विभागाने जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्यास सुरुवातही केली, पण महिना उलटत आला असतानाही अद्यापपर्यंत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही़
परिणामी तत्काळ आर्थिक मदतीची अपेक्षा बाळगणाºया शेतकºयांनी कृषी विभागाच्या सुस्त कारभारावर टिकेची झोड उठवली आहे़ जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर,रिसोड या भागात प्रामुख्याने बोंडअळीने कहर माजविल्याने कपाशी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले़ सोबतच बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करुन शेतकºयांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले होते़ दरम्यान, या वृत्ताची दखल घेत आमदार राजेंद्र पाटणी यांनी दुसºयाच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून बोंडअळीग्रस्त भागाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली होती़ त्याला मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हिरवी झेंडी दाखवली़ तदोत्तर जिल्हा कृषी विभागाकडून जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्याला प्रारंभ झाला़ पंचनाम्यासाठी तालुकानिहाय कृषी साहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक अशा तीन कर्मचाºयांची चमु तयार करण्यात आली असून ती बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करीत आहे़ परंतु, कुठे समन्वयाचा अभाव, वैयक्तिक हेवेदावे, वैयक्तिक कारणांमुळे सुट्टया, सार्वजनिक सुट्टयांपायी महिना उलटत आला असतानाही अद्यापपर्यंत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही़ त्यामुळे शेतकºयांमध्ये प्रशासनाच्या ढिम्म कारभाराप्रति नाराजी आहे़ याकडे संबधितांनी लक्ष देवून त्वरित पंचनामे पूर्ण करावे व शेतकºयांना मदत मिळवून देण्याची मागणी शेतकºयांतून केली जात आहे.