पांडे खूनप्रकरणी दोघांवर गुन्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:04 AM2017-07-19T01:04:45+5:302017-07-19T01:04:45+5:30
अनसिंग : येथून जवळच असलेल्या लाखी येथील विहिरीत १७ जुलैला संतोष पांडुरंग पांडे (रा.मंगरूळपीर) यांचा मृतदेह आढळला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अनसिंग : येथून जवळच असलेल्या लाखी येथील विहिरीत १७ जुलैला संतोष पांडुरंग पांडे (रा.मंगरूळपीर) यांचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी दोन आरोपींवर १८ जुलै रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, दोघांनाही शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी मृत पांडे यांचा भाऊ सुशील पांडुरंग पांडे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले, की मेथलकर लक्ष्मण सिरसाट (वय ३४ वर्षे) व कमल प्रताप चारावंडे (वय ३५ वर्षे, रा. मंगरूळपीर) यांनी संगनमत करून संतोषला मोटारसायकलवर बसवून अनसिंगला नेले. तेथे त्याला दारु पाजून तोंडावर मारहाण केली व विहिरीत ढकलून दिले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नमूद दोन्हीही आरोपींविरूद्ध कलम ३०२, ३४ भादंविनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींना न्यायालयासमक्ष हजर केले असता, दोघांनाही शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.