वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरपूरची ओढ; सलग दुसऱ्या वर्षी ६ लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:29 AM2021-07-18T04:29:09+5:302021-07-18T04:29:09+5:30
वाशिम : काेराेना संसर्गामुळे गत दाेन वर्षांपासून वारकऱ्यांना पढरपूरला जाता आले नाही. यामुळे वारकऱ्यांमध्ये खंत तर आहेच, ...
वाशिम : काेराेना संसर्गामुळे गत दाेन वर्षांपासून वारकऱ्यांना पढरपूरला जाता आले नाही. यामुळे वारकऱ्यांमध्ये खंत तर आहेच, शिवाय यामुळे एसटीलाही लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरवर्षी पंढरपूरच्या यात्रेमध्ये माेठ्या प्रमाणात भाविक जातात. काही बसने तर काही स्वत:च्या वाहनाने जातात. गत दाेन वर्षांपासून पंढरपूरला बस न गेल्याने गत दाेन वर्षांत १२ लाख रुपयांचे नुकसान एसटी महामंडळाला झाले आहे.
................
बस न पाठविण्याचे आदेश
यावर्षी पंढरपूरसाठी बस न पाठविण्याचे आदेश मुंबई सेंट्रलवरून देण्यात आले आहेत. यामुळे पंढरपूरला वाशिम आगारामधून एकही बस साेडण्यात येणार नाही.
- डी.एम. इलामे
बस आगार व्यवस्थापक, वाशिम
..............
शहरातून दरवर्षी जाणाऱ्या पालख्या
वाशिम शहरामधून दरवर्षी १७ पालख्या पंढरपूरसाठी रवाना हाेतात. गत दाेन वर्षांपासून काेराेना संसर्ग असल्याने या पालख्यांना जाता आले नाही.
वाशिम येथील वारकऱ्यांचा विसावा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाटाणे वाडीत दरवर्षी या पालख्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात येते. यामध्ये परजिल्ह्यातील पालख्यांचाही समावेश आहे.
............
वारकऱ्यांचेही मन रमेना...
काेराेना संसर्ग पाहता पंढरपूरला जाता येत नाही याची खंत आहे; परंतु आपले व आपल्या नागरिकांचे आराेग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. याही वर्षी घरूनच विठाेबाचे दर्शन घेऊ.
- शिवशंकर भाेयर,
वांगी, ता. वाशिम
गत १० वर्षांपासून सतत पंढरपूरची वारी केली आहे. गत दाेन वर्षांपासून यामध्ये खंड पडला आहे. काेराेना संसर्ग पांडुरंगा दूर कर व आम्हाला दर्शनाला बाेलाव, अशी विनवणी याहीवर्षी घरूनच करणार आहे.
केशव महाराज, नागठाणा, ता. वाशिम
.........
बस दरवर्षी पंढरपूरसाठी साेडल्या जायच्या ३०
रुपये उत्पन्न मिळायचे एसटी आगाराला ६०००००
प्रवासी एसटीतून दरवर्षी प्रवास करायचे १४००