वाशिम जिल्ह्यातील पूनर्वसित पांगरखेडा गाव सार्वजनिक पाणी पुरवठयापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 05:08 PM2017-11-17T17:08:39+5:302017-11-17T17:10:27+5:30
शिरपूर जैन : : मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पामुळे पांगरखेडा गावाचे पुर्नवसन शिरपूरच्या ई क्लास जमिनीवर चार वर्षापुर्वी करण्यात आले. तेव्हापासून पुर्नवसित पांगरखेडयात अद्यापही सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यात आली नाही.
शिरपूर जैन : : मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पामुळे पांगरखेडा गावाचे पुर्नवसन शिरपूरच्या ई क्लास जमिनीवर चार वर्षापुर्वी करण्यात आले. तेव्हापासून पुर्नवसित पांगरखेडयात अद्यापही सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यात आली नाही. तसेच ईतरही सुविधांचा अभाव येथे दिसून येत आहे.
मालेगाव तालुक्यात शिरपूरजैन जवळ एक ते दिड किलोमीटर अंतरावर मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्प निर्मितीचे काम सुरु आहे . पांगरखेडा गाव हे बुडीत क्षेत्रात येत असल्याने चर वर्षापुर्वी पांगरखेडचे पुर्नवसन शिरपूर ई क्लासच्या जमिनीवर करण्यात आले होते, मात्र पुर्नवसन करण्या अगोदर पुर्नवसीत गरजेचे असतान देखील अद्यापही येथे अनेक सुविधा ,सोयी निर्माण करण्यात प्रशासना चाल कल करीत आहे. त्यातील महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी होय. परिणामता पांगरखेड वसीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते अथवा खाजगी बोअरवाल्याकडून पाणी आणावे लागले. एप्रिलमध्ये गावात असलेले बोअरचे पाणी आटत असल्याने उन्हाळयात तिव्र पाणी टंचाइर् निर्माण होते. या वर्षी तर पाउस कमी झाल्याने जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईची झळ पुर्नवसीत पांगरखेडा वासीयांना असल्याचे गावकरी बोलत आहेत . मात्र लघू पाट बंधारे विभाग गावकºयांच्या सुविधेसाठी सार्वजनिक पाणी पुरवठयासाठी मंजूर असलेल्या विहीरीचे खोदकाम करण्यासाठी तत्पर नसल्याचे दिसून येत आहे . याच प्रमाणे नियोजित प्रवासी निवारा बाांधकामही अद्यापही सुरु करण्यात आले नाही. यासोबतच अनेक दिवसांपासून अर्ज करुनही विद्युत पुरवठा सुध्दा ग्रामस्थांना मिळाला नव्हता. तयार करण्यात आलेल्या रस्तयाची अतिशय दुरावस्था झाली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देवून पूनर्वसन झालेल्या नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.
पुर्नवसीत पांगरखेडावासीयांना पाणी पुरवठा करण्यासाठी नियोजित मंजूर विहीर खोदकाम करण्यासाठी निविदा काढण्यात येणार असून येत्या तिन महिन्यात विहीर खोदकाम पुर्ण करण्यात येईल.-- श्री.मा. हाते,अभियंता लघू पाटबंधारे विभाग, वाशिम.
आमच्या पांगरखेडा गावाचे पुर्नवसन करुन चार वर्श लोटली तरी सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करुन देण्यात पाटबंधारे विभागाने टाळाटाळ केली त्यामुळे गावातील लोकांना सतत पाण्याची समस्या जाणवते. - भगवान गावंडे, खरेदी विक्री संस्था अध्यक्ष तथा रहीवाशी पांगरखेडा.