पांगरी नवघरे जि.प. सर्कल पोटनिवडणूकीसाठी सहा अर्ज दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 07:10 PM2017-11-28T19:10:46+5:302017-11-28T19:16:50+5:30

जि.प. सदस्य उषा अनिल जाधव यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द ठरल्याने रिक्त झालेल्या तालुक्यातील पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलची पोटनिवडणूक १३ डिसेंबरला होऊ घातली आहे. त्यासाठी २८ नोव्हेंबर या अंतिम मुदतीच्या दिवशी सहा इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. 

Pangri Navghare ZP Six applications filed for circle byelection | पांगरी नवघरे जि.प. सर्कल पोटनिवडणूकीसाठी सहा अर्ज दाखल!

पांगरी नवघरे जि.प. सर्कल पोटनिवडणूकीसाठी सहा अर्ज दाखल!

Next
ठळक मुद्दे१३ डिसेंबरला निवडणूकराजकीय वातावरण तापले

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम): जि.प. सदस्य उषा अनिल जाधव यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द ठरल्याने रिक्त झालेल्या तालुक्यातील पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलची पोटनिवडणूक १३ डिसेंबरला होऊ घातली आहे. त्यासाठी २८ नोव्हेंबर या अंतिम मुदतीच्या दिवशी सहा इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. 
अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरिता राखीव असलेले मालेगाव तालुक्यातील एकमेव पांगरी नवघरे जि.प. सर्कल शिवसेनेच्या ताब्यात होते. मात्र, जातवैधता प्रमाणपत्र रद्द ठरल्याच्या कारणावरून जि.प. सदस्य उषा अनिल जाधव यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यासाठी २३ नोव्हेंबरपासून २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, २७ नोव्हेंबरपर्यंत एकही अर्ज सादर झालेला नव्हता. २८ नोव्हेंबर या शेवटच्या दिवशी मात्र सहा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून निवडणूकीत विजयश्री मिळविण्याच्या दृष्टीकोणातून रणांगणात उडी घेतली आहे. या सहा उमेदवारांपैकी कोण माघार घेतो आणि प्रत्यक्षात कोण निवडणूक रिंगणात शिल्लक राहून बाजी मारतो, याकडे पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलमधील नागरिकांचे लक्ष लागून आहे. 
 

Web Title: Pangri Navghare ZP Six applications filed for circle byelection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.