पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमती मोहीम!
By admin | Published: June 14, 2017 07:50 PM2017-06-14T19:50:45+5:302017-06-14T19:50:45+5:30
वाशीम : ७ ते ९ जुलै दरम्यान पन्हाळा पावनखिंड गडकिल्ले पावसाळी पदभ्रमती मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती हिंदवी परिवाराचे जिल्हाप्रमुख दिलीप मेसरे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशीम : पन्हाळा पावनखिंड गडकिल्ले पावसाळी पदभ्रमती मोहीम प्रक्रीयेस सुरुवात करण्यात आली असून ७ ते ९ जुलै दरम्यान ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती हिंदवी परिवाराचे जिल्हाप्रमुख दिलीप मेसरे यांनी दिली.
हिंदवी परिवाराच्यावतीने दरवर्षी अनेक नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम आहे. शिवरायांच्या पदस्पशार्ने पावन झालेल्या प्रत्येक गडकोटांना, युध्दभूमिवर शिवभक्तांना प्रत्यक्ष घेवून भुगोलासह इतिहासाची माहिती देण्यासाठी, आजच्या युवा पिढीला शिवरायांच्या इतिहासाची माहिती व्हावी, शिवरायांचे विचार प्रत्येक युवकांपर्यत पोहचावे या उद्देशाने या मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रतील प्रसिध्द शिवचरित्रकार, शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेट्ये, सरनौबत रामदास पाटील, अमोल मोहीते, संभाजी पाटील भोसले, अभिजीत भडांगे, दिलीप मेसरे आदी या मोहीमेचे नेतृत्व करणार आहेत. वाशीम जिल्हयातील इच्छुकांनी मोहीमेत सहभागी होण्यासाठी पुरुषांसाठी देविदास धामणे, निखिल गोरे वाशीम, महिलांसाठी लताताई धामणे, लक्ष्मी महाजन वाशीम, उल्हास वानखडे कारंजा, विष्णू गावंडे मंगरुळपीर, सदानंद दाभाडकर मानोरा, आनंद राजे देशमुख, प्रा. बावीस्कर, अजित सोनोने, प्रा. मुंजाळ, संतोष जाधव मालेगाव, महिलांसाठी साधना जाधव मालेगाव, डॉ. अश्वीन काटेकर शिरपुर,किशोर शर्मा, अनिल बाभणीकर रिसोड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख दिलीप मेसरे यांनी केले आहे.