पानी फाउंडेशनच्या सोया-विन स्पर्धेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:27 AM2021-06-29T04:27:25+5:302021-06-29T04:27:25+5:30

सोया-विन स्पर्धेत कारंजा तालुक्यातील सर्व गावांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत पानी फाउंडेशनने सोयाबीन या विषयावर तयार केलेल्या ...

Pani Foundation's soy-win competition results announced | पानी फाउंडेशनच्या सोया-विन स्पर्धेचा निकाल जाहीर

पानी फाउंडेशनच्या सोया-विन स्पर्धेचा निकाल जाहीर

Next

सोया-विन स्पर्धेत कारंजा तालुक्यातील सर्व गावांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत पानी फाउंडेशनने सोयाबीन या विषयावर तयार केलेल्या सात प्रकारच्या माहितीपर चित्रफितीवर आधारित २५ प्रश्न विचारण्यात आले होते. त्यांची उत्तरे बऱ्याच गावातील शेतकऱ्यांनी दिली. स्पर्धेच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्याने सर्वात अगोदर व सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली, त्याला विजेता घोषित करण्यात आले. या स्पर्धेत शेलू खु. या गावातील रिना दादाराव मोडकने प्रथम, प्रीती देवानंद मनवरने द्वितीय, तर गौरव नंदकिशोर वर्मा यांनी तृतीय क्रमांक पुरस्कार पटकावला आहे.

तसेच तालुक्यातील १५ शेतकऱ्यांनी २५ पैकी २५ गुण मिळविले आहेत. दर रविवारी पानी फाउंडेशनच्या यू-ट्यूब चॅनलवर लाइव्ह शेतीशाळा घेण्यात आली. त्यामध्ये या सोया-विन शेतकरी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. शेलु खु. या गावातील ३ विजेत्यांशी पानी फाउंडेशनचे संस्थापक तथा अभिनेता आमीर खान यांनी लाइव्ह संवाद साधला व विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच या विजेत्यांना बक्षिसेसुद्धा देण्यात आली. त्यामध्ये प्रथम बक्षीस सायकल कोळपे, दुसरे फेरोमन ट्रॅप व तिसरे चिकट सापळे होते. विजेत्या शेतकऱ्यांना विभागीय समन्वयक सुभाष नानवटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहून सदर सोया-विन ही स्पर्धा आता येत्या गुरुवारी म्हणजेच १ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रसाठी ठेवण्यात आली आहे. तरी सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यात भाग घ्यावा व दर रविवारी पानी फाउंडेशनच्या यू-ट्यूब पेजवर होणारी डिजिटल शेतीशाळा आवर्जून पहावी, असे आवाहन तालुका समन्वयक रवींद्र लोखंडे यांनी केले आहे.

Web Title: Pani Foundation's soy-win competition results announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.