कारंजा शहरात पिंतांबर महाराज गुरू गजानन महाराज पालखी सोहळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 02:29 PM2017-11-04T14:29:16+5:302017-11-04T14:30:19+5:30

कारंजा  : श्री पितांबर महाराज गुरूश्री गजानन महाराज संस्थान श्री श्रीक्षेत्र कोंडाली मानोरा येथील श्री पिंताबर महाराज यांच्या पालखी दर्शन सोहळयानिमित्त कारंजा शहरात ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजपापासून  शोभा यात्रा काढण्यात येणार आहे.

Pantampar Maharaj Guru Gajanan Maharaj Palqi ceremony in Karanja city | कारंजा शहरात पिंतांबर महाराज गुरू गजानन महाराज पालखी सोहळा 

कारंजा शहरात पिंतांबर महाराज गुरू गजानन महाराज पालखी सोहळा 

Next
ठळक मुद्देसोमवारी शोभायात्राभाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन

कारंजा  : श्री पितांबर महाराज गुरूश्री गजानन महाराज संस्थान श्री श्रीक्षेत्र कोंडाली मानोरा येथील श्री पिंताबर महाराज यांच्या पालखी दर्शन सोहळयानिमित्त कारंजा शहरात ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजपापासून  शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. यात भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दरवर्षी प्रमाण पिंताबर महाराज गुरूश्री गजानन महाराज यांच्या पालखीचे कारंजा येथे ६ नोव्हेंबर रोजी आगमन होणार आहे. कारंजा शहरात संपुर्ण दिवसभरात पालखीदर्शन सोहळयानिमित्ता  शोभायात्रा काढण्यात येणार आहे. पालखीमध्ये अश्व, दिंडी, वारकरी, रथ व भाविक भक्त यांचा समावेश राहणार आहे. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८वाजता कारंजा येथील श्री संत नामदेव महाराज मंदीरापासून पालखीदर्शन सोहळयास प्रारंभ होणार आहे.  पितांबर महाराज पंचक्रोशितील प्रसिध्द देवस्थान असून येथे भाविकांची गर्दी राहते.

त्यांनतर ही पालखी श्री विठठल मंदीर, श्री गुरूमंदीर संस्थान, श्री गजानन महाराज मंदीर पोलीस स्टेशन, जे.सी.हायस्कुल चैक, रामासावजी चैक, जिजामाता चैक, श्री शनि मंदीर चैक, श्रीदत्त मंदीर चैक, मोठे राममंदीर येथे दुपारची विश्राती व प्रसादाचा कार्यक्रम होईल. मोठे राममंदीर नेताजी सुभाषचं्रद चैक, संतोषी माता कॉलनी, हनुमान मंदीर, शिवाजी नगर झाशी राणी चैक बायपास, गुरूकुपा हॉटेल, सुदर्शन कॉलनी, श्री गजानन महराज मदीर वनदेवी नगर, किर्तीनगर, श्री गजानन महराज मंदीर ममतानगर, झाशी राणी चैक बायपास, विठठल मंदीर, यशवंत कॉलनी, दत्त कॉलनी, श्री संत गजानन महाराज मंदीर महाविर कॉलनी, तेजस कॉलनी, दामिनीनगर, एस.एस.इ.बी कॉलनी मातोश्री, श्री संत गजानन महाराज मंदीर सुंदर वाटीका, बाबरे कॉलनी मधीर संत गजानन महाराज मंदीर मार्ग बाबासाहेब धाबेबर सभागृह येथे आल्यानंतर तेथेच रात्रीचा मुक्काम राहणार आहे. 

कारंजा येथून सदर पालखी सोहळा मुतीर्जापुर, अकोला मार्ग शेगाव येथे जानार आहे.     पालखी सोहळया मध्ये भाविक भक्तांनी बहुसंख्येने सहभागी होवून दर्शनाचा लाभ घ्यावा तसेच यथाशक्तीने मदत करावी आणि या शिवाय पालखी ज्या ज्या मागार्ने जात आहे. त्या मागार्तील नागरीकांनी घरासमोर रांगोळी काढावी परीसरात सुशोभीत करावा असे आवाहन श्री पितांबर महाराज गुरूजी गजानन महाराज पालखी उत्सव समिती कारंजा यांनी केले आहे.  

Web Title: Pantampar Maharaj Guru Gajanan Maharaj Palqi ceremony in Karanja city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.