पपई फळबागेवर किडींचा प्रादुर्भाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:44 AM2017-10-25T01:44:04+5:302017-10-25T01:44:42+5:30
शेलूबाजार: एकेकाळी पपई उत्पादनासाठी नावलौकिक मिळविणार्या मंगरुळपीर तालुक्यातील हिरंगी येथील शेतकरी आता पपईवरील विविध प्रकारच्या किडींमुळे हवालदिल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार: एकेकाळी पपई उत्पादनासाठी नावलौकिक मिळविणार्या मंगरुळपीर तालुक्यातील हिरंगी येथील शेतकरी आता पपईवरील विविध प्रकारच्या किडींमुळे हवालदिल झाले आहेत.
गेल्या दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील पपईला देश-विदेशातून मागणी होती; पंरतु अलीकडच्या काळात निसर्गाचा प्रकोप आणि अचानकपणे येणार्या ‘व्हायरस’च्या प्रादुर्भावामुळे तसेच बाजारपेठेत पपईला आवश्यकतेनुसार दर न मिळाल्यामुल्लळे पपई उत्पादक शेतकरी अडचणीचा सामना करीत आहे. हिरंगी येथील विनोद कोंडजी सावके, सुनील कोंडुजी सावके, तसेच किसनराव सावके यांच्या शेतातील पपईच्या बागावर ‘व्हायरस’ने (कीड) मोठय़ा प्रमाणात आक्रमण केले आहे. यामुळे शेतकर्यांना जबर आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. लागवडीपासून ते आतापर्यंत पपईच्या झाडावर विविध रोगांचा प्रादुर्भाव सुरू आहे. मोठय़ा प्रमाणात खर्च करून फळबाग जिवंत ठेवण्याचा प्रयत्न शेतकर्यांनी केला. गत १५ दिवसांपासून पपईची पाने ‘व्हायरस’मुळे गळून पडत असल्याचे दिसून येते. यामुळे लागवड खर्चसुद्धा वसूल होण्याचे चिन्हे दिसत नाही. २४ ऑक्टोबर रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत गीते, कृषी विज्ञान केंद्र करडाचे कीटकशास्त्रज्ञ आर.एस. डवरे यांनी फळबागे भेट देऊन पाहणी केली. यावेळी सदर अधिकार्यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. शिवाय याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले.