पार्डी ताडच्या ग्रामपंचायत सदस्यांना मिळाले मानधन

By admin | Published: June 16, 2017 01:18 AM2017-06-16T01:18:29+5:302017-06-16T01:39:15+5:30

प्रशासनाची दखल: ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केले समाधान

Pardi Tad's Gram Panchayat members received the honor | पार्डी ताडच्या ग्रामपंचायत सदस्यांना मिळाले मानधन

पार्डी ताडच्या ग्रामपंचायत सदस्यांना मिळाले मानधन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पार्डी ताड : मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड ग्रामपंचायतचे सरपंच व ग्राम सदस्य मागील दोन वर्षांपासून मानधनापासून वंचित होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने ११ जूनच्या अंकात ‘ग्रा.पंं. सदस्य दीड वर्षांपासून मानधनापासून वंचित’, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर गुरुवारी या ग्रामपंचायतच्या उपसरपंचासह सर्व सदस्यांना त्यांचे मानधन अदा करण्यात आले.
पार्डी ताड ग्रामपंचायतची निवडणूक ४ आॅगस्ट २०१५ रोजी पार पडली. तेव्हापासून या ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्यांचे मानधन व भत्ता अदा करण्यात आले नव्हते. यासंदर्भात सदस्य आणि सरपंचांनी ग्रामपंचायत सचिवांकडे वारंवार विषय उपस्थित करून मानधन अदा करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली; परंतु त्याचा काहीच फायदा होऊ शकला नव्हता. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतच्या माजी सदस्यांचेही मानधन अदा करण्यात आले नव्हते. शासनाने आधीच तुटपुंजे मानधन निश्चित केले असताना तेसुद्धा नियमित अदा होत नसल्याने ग्रामपंचायत सदस्यांत तीव्र नाराजीचे वातावरण आहे. एकीकडे आमदार आणि खासदार यांना दरवर्षी मासिक लाखो रुपये मानधन दिले जाते, तसेच त्यांना मासिक पेन्शनसह इतरही सुविधा दिल्या जात असताना ग्रामपंचायत सदस्यांना मात्र २५ रुपये भत्ता दिल्या जातो. केवळ २५ रुपये भत्ता हा खूप कमी असल्यामुळे ग्रामपंचायतच्या मासिक सभेला ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती फारच कमी असते. त्यामुळे ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये गाव विकासाबाबत योग्य ठराव घेणे शक्य होत नाही. त्यामुळे गावाचा विकास होत नाही. सद्यस्थितीत मजुरांना दोनशे रुपये मजुरी मिळते, तर ग्रामपंचायत सदस्यांना तीनशे रुपये भत्ता असावा, अशी मागणी होत आहे. पार्डीताड येथील ग्रामपंचायतच्या सदस्यांना गेल्या २२ महिन्यांपासून भत्ता व सरपंचाचे मानधन प्राप्त झाले नव्हते, तसेच माजी सदस्यांचाही भत्ता थकीत होता. यासंदर्भात मंगरुळपीर पंचायत समितीमधील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यावेळी फेब्रुवारी २०१७ पर्यंतचे ग्रामपंचायत कर्मचारी सरपंचचे मानधन, तसेच ग्रामपंचायत सदस्यांचा भत्ता ग्रामपंचायतकडे दिला असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. लोकमतने यासंदर्भात ११ जूनच्या अंकात वृत्त प्रकाशित करून त्यांची समस्या मांडली. ग्रामपंचायत सचिवांनी दखल घेऊन आजी, माजी सदस्यांसह सरपंच, उपसरपंचांचे मानधन गुरुवारी अदा केले. या ग्रामपंचायतच्या सातही सदस्यांना २५ रुपये मासिक भत्त्याप्रमाणे प्रत्येकी ४५० रुपये, तर उपसरपंचांना ४५० रुपये मानधन प्रमाणे १८ महिन्यांचे ७ हजार ११० रुपये अदा केले. दरम्यान, पार्डी ताडनजिकच्या कंझरा येथील ग्रामपंचायत सदस्यांचे मानधनही थकलेले होते. याचा उल्लेख लोकमतच्या वृत्तात करण्यात आला होता. या ग्रामपंचायतच्या सदस्यांनाही त्यांचे थकीत मानधन अदा करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Web Title: Pardi Tad's Gram Panchayat members received the honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.