शिक्षकांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यासाठी पालक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:37 PM2019-08-19T12:37:58+5:302019-08-19T12:38:02+5:30
प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांनी गटशिक्षणाधिकाºयांकडे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : तालुक्यातील गलमगव्हाण येथील जि.प.शाळेवर कार्यरत शिक्षकाची प्रतिनियुक्ती भुली येथील शाळेवर केली असून, सदर प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांनी गटशिक्षणाधिकाºयांकडे केली.
निवेदनात म्हटले की, जि.प.प्राथमिक शाळा गलमगाव येथे कार्यरत शिक्षक धिरज आडे यांची बदली प्रतिनियुक्तीवर भुली येथील शाळेवर करण्यात आली. आरटीई अॅक्टनुसार शिक्षकाला प्रतिनियुक्तीवर पाठविता येत नाही. एक शिक्षकी शाळेवर रुपांतर व्दिशिक्षकी शाळेत करण्यात आले. त्यामुळे गलमगाव शाळेत आॅनलाईन बदलीमध्ये दोन शिक्षक दाखविण्यात येत आहे. दोन शिक्षक असतांना एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती कशी करण्यात आली असा प्रश्न उपस्थित करून या शिक्षकाची झालेली प्रतिनियुक्ती रद्द करावी अन्यथा शाळेला कुलुप ठोकुन शाळा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात भरविण्यात येईल असा इशारा देण्यात आला. निवेदनावर मारोती अंबुरे, अशोक कुरकुरे, ऋषीकेश हागोने, गजानन उईके, लक्ष्मण मिराशे, पवन मुंदे, दत्ता करसडे, अजय बांडे, रमेश करसडे, मनिष पाटील यांच्यासह ७० नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.