केंद्रीय विद्यालयातील प्रवेश अर्जासाठी पालकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 03:38 PM2018-10-05T15:38:42+5:302018-10-05T15:39:12+5:30

शेवटची दिवशी अर्ज घेण्यासाठी पालकांची एकच गर्दी झाली असून, ६ आॅक्टोंबर रोजी परिपूर्ण अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे.

Parents' rush for admission application in Kendriya Vidyalaya | केंद्रीय विद्यालयातील प्रवेश अर्जासाठी पालकांची गर्दी

केंद्रीय विद्यालयातील प्रवेश अर्जासाठी पालकांची गर्दी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम जिल्ह्यात नव्याने सुरु होत असलेल्या केंद्र सरकारच्या केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवी वर्गातील प्रवेशासाठी २६ सप्टेंबर ते ५ आॅक्टोबर या कालावधीत अर्ज वितरण करण्यात येत आहे. शेवटची दिवशी अर्ज घेण्यासाठी पालकांची एकच गर्दी झाली असून, ६ आॅक्टोंबर रोजी परिपूर्ण अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे.
आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत वाशिमचा समावेश असून, शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. अशातच जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय मंजूर झालेले असून, २६ सप्टेंबरपासून केंद्रीय विद्यालय वाशिम, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डायट), रिसोड रोड, वाशिम येथे अर्ज वाटप प्रक्रिया सुरू झाली. ५ आॅक्टोबरपर्यंत अर्ज वितरणाचा अंतिम दिवस असल्याने शेवटच्या दिवशी पालकांची एकच गर्दी झाल्याचे दिसून येते. भरलेले परिपूर्ण अर्ज ६ आॅक्टोंबर २०१८ पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. प्रवेशास पात्र असलेल्यांची यादी १० आॅक्टोंबर २०१८ रोजी विद्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात येईल. प्रवेशास पात्र ठरलेल्यांची प्रवेश प्रक्रिया ११ ते १७ आॅक्टोंबर २०१८ या कालावधीत होणार आहे. प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय विद्यालयाच्या सन २०१८-१९ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार होणार आहे. प्र्रवेशासाठी आलेले अपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

Web Title: Parents' rush for admission application in Kendriya Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.