पालकांनो, लहान मुलांना जपा; कोरोनाचा धोका वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:42 AM2021-04-04T04:42:33+5:302021-04-04T04:42:33+5:30
जिल्ह्यात १५ फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाचा धोका अधिकच वाढलेला आहे. गेल्या दीड महिन्यांत ८ हजारांवर नवे कोरोना बाधित रुग्ण ...
जिल्ह्यात १५ फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाचा धोका अधिकच वाढलेला आहे. गेल्या दीड महिन्यांत ८ हजारांवर नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे प्रशासनाने पुर्वीच्या तुलनेत अधिक कठोर नियम लागू केले असून त्याचे उल्लंघन करणारांविरोधात कारवाई केली जात आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांत आता लहान मुलांनाही कोरोना विषाणू संसर्गाची बाधा होत असल्याचे दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार, शून्य ते सहा वर्षे वयोगटातील २३१ आणि ७ ते १८ वर्षे वयोगटातील १५८८ अशा एकूण १८१९ मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
...................
एप्रिल महिन्यात धोका वाढला.
१ एप्रिल - ७/१३
२ एप्रिल - ९/१६
३ एप्रिल - ६/२७
.................
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या
१६६९९
...................
मार्च महिन्यातील आकडेवारी काय सांगतेय?
० ते पाच वर्षे वयोगटातील पाॅझिटिव्ह - ११२
६ ते १८ वर्षे वयोगटातील पाॅझिटिव्ह - ७४९
.......................
पाच दिवसांत कोरोनामुक्त झालेल्यांची आकडेवारी
सोमवार - २६९
मंगळवार - ३४२
बुधवार - २१०
गुरूवार - २७८
शुक्रवार - ३०६
............................
काळजी घ्या, घाबरू नका
वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट वाढत चालले असून बाधितांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत आहे. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहत असल्याने घाबरण्याचे कुठलेच कारण नाही.
- डाॅ. हरीश बाहेती
.....................
गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांनाही कोरोनाची बाधा होत आहे. असे असले तरी मुलांची रोगप्रतिकारशक्ती दमदार असल्यास त्यांना कुठलाही विशेष धोका होण्याची शक्यता नाही. तरीदेखिल पालकांनी लक्ष द्यावे.
- डाॅ. राम बाजड