वाशिम येथे व्यापाऱ्यांना पार्कींगचा त्रास;  व्यापाऱ्यांचे कडकडीत बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 05:32 PM2018-11-28T17:32:52+5:302018-11-28T17:33:07+5:30

व्यापाऱ्यांना होणार त्रास लक्षात घेता शहरातील पार्कींगच बंद करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी  २८ नोव्हेंबर रोजी पाटणी चौकात ठिय्या आंदोलन करुन केली.

Parking lot creat troubles to traders ; agitation at washim | वाशिम येथे व्यापाऱ्यांना पार्कींगचा त्रास;  व्यापाऱ्यांचे कडकडीत बंद आंदोलन

वाशिम येथे व्यापाऱ्यांना पार्कींगचा त्रास;  व्यापाऱ्यांचे कडकडीत बंद आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम  :  शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, नागरिकाना याचा त्रास होवू नये याकरिता शहरात पार्कींगची व्यवस्था करण्यात आली, परंतु या पार्कींगचा व्यापाऱ्यांना होणार त्रास लक्षात घेता शहरातील पार्कींगच बंद करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी  २८ नोव्हेंबर रोजी पाटणी चौकात ठिय्या आंदोलन करुन केली.
शहरातील पाकींग व्यवस्थेमुळे दुचाकी वाहनधारकांना वाहने शिस्तीत ठेवण्याची सवय लागली असली तरी व्यापाऱ्यांच्या दुकानात जाण्यासाठी जागाच राहत नसल्याने व्यापारी त्रस्त झालेत. शिवाय दोन मिनीटे जरी वाहन रस्त्यावर उभे राहल्यास पार्कींगवाले येवून संबधितांना दंड करीत असल्याने व्यापाºयांचे नुकसान होत आहे. तसेच पार्कींगवाल्यांनी पार्कींग ठिकाणी ईतर फेरीवाले, दुकानदार बसत असतांना त्यांना काहीच न म्हणता बिनधास्तपणे आपली दुकानदारी सुरु ठेवली आहे. व्यापाऱ्यांकडे येणाऱ्या ग्राहकांनी वाहने कुठे उभी करावी हा मुददा उपस्थित करुन व्यावसायिकांनी पाटणी चौकात येवून ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावल्याशिवाय हे आंदोलन थांबविण्यात येणार नसल्याचा पवित्रा व्यापाºयांनी घेतला होता. जवळपास पाटणी चौक ते शिवाजी चौका दरम्यान सर्वच व्यापाºयांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याने दुकाने कडकडीत बंद आढळून आलेत. 


 

Web Title: Parking lot creat troubles to traders ; agitation at washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.