अंशकालीन महिला परिचारांचा साेमवारी संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:34 AM2021-07-25T04:34:17+5:302021-07-25T04:34:17+5:30
जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रात सेवारत १५३ अंशकालीन महिला परिचरांना केवळ ३ हजार रुपये एवढे अत्यल्प मानधन असून, कामाचा ...
जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रात सेवारत १५३ अंशकालीन महिला परिचरांना केवळ ३ हजार रुपये एवढे अत्यल्प मानधन असून, कामाचा अतिरिक्त बोजा आहे, याशिवाय त्यांना रात्री-बेरात्री ग्रामीण भागात व कोविड केअर सेंटरमध्ये काम करावे लागते. या सर्व कामांमुळे महिला परिचरांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासह कोविड भत्ता व अतिरिक्त कामाचा मोबदला मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवार, २६ जुलै रोजी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत संपाचा पुकारा केला आहे. महासंघाच्या अध्यक्षा गंगुबाई पवार यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासन, तसेच जि.प. प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी लताबाई सेजव, रीना चव्हाण, सुरेखा पवार, रेखा मनोहर, आशाबाई खिराडे आदी हाेते.