गटशेती उपक्रमात सहभागी होऊन निर्यातक्षम संत्रा बागा निर्माण कराव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:44 AM2021-09-18T04:44:57+5:302021-09-18T04:44:57+5:30

कृषी विज्ञान केंद्राच्या दत्तक गाव वडजी येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने संत्रा उत्पादक गट निर्मिती करून प्रत्येक महिन्याला शिवारफेरी ...

Participate in group farming activities and create exportable orange orchards | गटशेती उपक्रमात सहभागी होऊन निर्यातक्षम संत्रा बागा निर्माण कराव्या

गटशेती उपक्रमात सहभागी होऊन निर्यातक्षम संत्रा बागा निर्माण कराव्या

Next

कृषी विज्ञान केंद्राच्या दत्तक गाव वडजी येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने संत्रा उत्पादक गट निर्मिती करून प्रत्येक महिन्याला शिवारफेरी व चर्चासत्राचे आयोजन करण्यात येते. याच उपक्रमाचा भाग म्हणून १४ सप्टेंबर २०२१ रोजी शिवारफेरी व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षणतज्ज्ञ राजेश डवरे, तर प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा विभागीय कृषी सह संचालक शंकरराव तोटावार यांची उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील, तसेच तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत उलामाले, कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी सहायकांसह वडजी गावातील समस्त संत्रा उत्पादक, वसारी, मांगुळ झनक येथील संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या उपस्थित होते. सर्वप्रथम शिवारफेरी करून केशवराव बोरकर व विजयराव देशमुख यांच्या इंडो-इस्रायल तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या बागांची विलासराव बोरकर, प्रदीप बोरकर, शंकरराव बोरकर, राजेश बोरकर आदी शेतकऱ्यांच्या बागांना भेटी देऊन निरीक्षणे घेण्यात आली. शंकरराव तोटावार यांनी वडजी येथील शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनात गटाच्या माध्यमातून शेती करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ज्ञानाची देवाण-घेवाण केल्यास त्याचा फायदा होतो, असे दिसून आल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वडजी येथील युवा शेतकऱ्यांनी अथक प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास बोरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन नंदुभाऊ देशमुख यांनी केले.

Web Title: Participate in group farming activities and create exportable orange orchards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.