पक्ष निरीक्षकांनी घेतला ‘सदस्यां’चा आढावा !
By admin | Published: June 24, 2016 12:03 AM2016-06-24T00:03:56+5:302016-06-24T00:03:56+5:30
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या पृष्ठभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षकांनी घेतला आढावा.
वाशिम: जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षकांनी स्थानिक विश्रामगृहात गुरूवारी स्वतंत्रपणे सदस्यांचा आढावा घेतला. काँग्रेसचे निरीक्षक श्यामबाबु उमाळकर व जिल्हा प्रभारी मदन भरगड यांनी जि.प. अध्यक्षपदाबाबत सदस्यांची मते जाणून घेतली. इच्छूक उमेदवार आणि त्यांच्या सर्मथनार्थ असलेले सदस्य यांचा कल जाणून घेतल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. तसेच राकाँचे प्रदेश सरचिटणीस व वाशिम जिल्हा प्रभारी बसवराज पाटील यांनीदेखील राकाँ सदस्यांचे मत व कल जाणून घेतला. दरम्यान काँग्रेस-राकाँ युती होण्याचे संकेत विश्वसनीय सूत्रांनी दिले.