मालेगाव येथील वृषभनाथ दिगंबर जैन मंदिरात पर्युषण पर्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 05:54 PM2018-09-17T17:54:09+5:302018-09-17T17:55:01+5:30
मालेगाव: येथील श्री वृषभनाथ जैन मंदिर येथे पर्युषण पर्वाला मोठ्या भक्ती भावात प्रारंभ करण्यात आला.
लोकमत न्यूज
मालेगाव: येथील श्री वृषभनाथ जैन मंदिर येथे पर्युषण पर्वाला मोठ्या भक्ती भावात प्रारंभ करण्यात आला.
येथील दिगंबर जैन मंदिरात यंदाही जैन धर्मातील महान पर्व असलेले आणि सतत दहा दिवस चालणाºया पर्युषण पर्वानिमित्त विविध कार्यक्रमांंचे आयोजन करण्यात आले आहे.
या अंतर्गत रोज सकाळी सहा वाजता धार्मिक प्रवचन, ७ ते ८ भगवंतांचा अभिषेक आणि रात्री सामुहिक आरती व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरासह तालुक्यातील जैन बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित राहतात हा महान पर्वात जैन धर्मीय बांधव मोठ्या आनंदात व उत्साहात सहभागी होत आहेत. या पर्युषण पर्वात जैन बांधव दहा दिवस उपवास करतात, श्रावक तप व आराधना करतात. पर्युषण पर्वाच्या अभिषेक पुजेला जैन मंदिराचे अध्यक्ष जितेन्द्र टिकाईत, संजय कान्हेड, सुभाष रोकडे, आशिष डहाळे, धिरज कान्हेड, आलोक बांडे, अमोल रोकडे, वसंतकुमार कान्हेड, संदीप सावले, प्रेरणा गोरे, भारती टिकाईत आदि उपस्थित होते. यावेळी मंदिरात अभिषेक आणि पुजेची बोली लावण्यात आली. यावेळी आलेल्या देणगीचा उपयोग मंदिर बांधकामासाठी करण्यात येतो.