नापास विद्यार्थ्याला दाखविले पास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:05 AM2017-09-27T01:05:04+5:302017-09-27T01:06:47+5:30
वाशिम: सातवी नापास असताना, उत्तीर्ण दाखवून आठवीत प्रवेश दिला आणि नोकरीचे आमिष दाखवून सेवानवृत्त मु ख्याध्यापकाने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार चिंचाबाभर येथील माणिकराव देवराव सानप यांनी २५ सप्टेंबरला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली. या तक्रारीतील तथ्य जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून चौकशी केली जाईल, असे शिक्षण विभागाने मंगळवारी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क

रिसोड तालुक्यातील चिंचाबा भर येथील माणिकराव सानप यांनी तक्रारीत म्हटले की, चिंचाबा येथील खासगी शाळेत ते शिकत होते. सातवा वर्ग नापास झाल्यानंतर तत्कालीन मुख्याध्यापक भगवान भिसे यांनी सातवा वर्ग पास दाखवून इयत्ता आठव्या वर्गात प्रवेश दिला. यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर आठवा व नवव्या वर्गातही उत्तीर्ण केले. इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसू न देता, नववी उत्तीर्णच्या पात्रतेवर शिपाई पदावर नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी सविस्तर चौकशी करून दोषी आढळणार्यांविरुद्ध कारवाई करावी अन्यथा बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा माणिकराव सानप यांनी निवेदनाद्वारे दिला.
माणिकराव भिसे यांच्या तक्रारीतील मजकूर बघितल्यानंतर त्या दृष्टिकोनातून चौकशी केली जाईल. या प्रकरणातील तथ्य तसेच नेमका हा काय प्रकार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
- अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) वाशिम