प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेले प्रवासी निवारे झाले जमीनदोस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 05:27 PM2019-02-19T17:27:44+5:302019-02-19T17:28:24+5:30
रिसोड (वाशिम) : पावसाळ्यात पावसापासून; तर उन्हाळ्यात तापणाºया कडक उन्हापासून प्रवाशांचा बचाव व्हावा, या उद्देशाने कधीकाळी उभारण्यात आलेले बहुतांश ठिकाणचे प्रवासी निवारे आजमितीस जमिनदोस्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : पावसाळ्यात पावसापासून; तर उन्हाळ्यात तापणाºया कडक उन्हापासून प्रवाशांचा बचाव व्हावा, या उद्देशाने कधीकाळी उभारण्यात आलेले बहुतांश ठिकाणचे प्रवासी निवारे आजमितीस जमिनदोस्त झाले आहेत. यामुळे वाहनांची प्रतीक्षा करित असताना प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
रिसोड-वाशिम रस्त्यासह मालेगाव, लोणार, मेहकरकडे जाणाºया मार्गावर विविध ठिकाणी प्रवासी निवारे उभारण्यात आले होते. गावापासून फाट्यापर्यंत आल्यानंतर वाहनांची प्रतीक्षा करित असताना नागरिकांची गैरसोय होवू नये, हा त्यामागील मूळ उद्देश होता. कालांतराने मात्र बहुतांश प्रवासी निवाºयांची दुरवस्था होवून ते मोडकळीस आले; तर काही निवारे जमिनदोस्त झाले आहेत.
रिसोड-वाशिम मार्गावरील पाच प्रवासी निवारे नेस्तनाबूत!
रिसोड ते वाशिम मार्गावरील ११ गावांशेजारी प्रवासी निवारे उभारण्यात आले होते. त्यातील सवड, वनोजा, आसेगाव, रिठद, मोहजा, नागठाणा येथील निवारे बºयापैकी तग धरून आहेत; तर हराळ, घोटा, चिखली, बेलखेडा, वांगी या पाच गावांमधील निवारे पूर्णत: नेस्तनाबूत झाली आहेत. तसेच रिसोड-मालेगाव मार्गावरील खडकी, लिंगा कोतवाल आणि मसला या तीन गावांच्या फाट्यावर उभारलेले प्रवासी निवारेही आजमितीस गायब झाल्याचे दिसत आहे.