खाजगी मालवाहू वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:45 PM2017-10-17T13:45:21+5:302017-10-17T13:45:35+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या पृष्ठभूमीवर दिवाळीच्या उत्सवात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून संप मिटेपर्यंत खाजगी मालवाहू वाहने, खाजगी कपंल्यांच्या बसगाड्या, स्कूल बसेस, यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील अधिसूचना गृहविभागाने १६ आॅक्टोबरच्या रात्रीच जारी केली आहे.
वाशिम: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या पृष्ठभूमीवर दिवाळीच्या उत्सवात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून संप मिटेपर्यंत खाजगी मालवाहू वाहने, खाजगी कपंल्यांच्या बसगाड्या, स्कूल बसेस, यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील अधिसूचना गृहविभागाने १६ आॅक्टोबरच्या रात्रीच जारी केली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) संघटनेने त्यांच्या विविध मागण्यांसाठी १६ आॅक्टोबर २०१७ च्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे दिवाळीच्या उत्सवात एसटीच्या प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. ही गैरसोय टळावी यासाठी प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या उपाय योजना करणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या ५९ मधील कलम ६६ चे उपकलम (३) चा खंड (एन) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व खाजगी बसगाड्या, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे. एसटी कर्मचाºयांचा प्रस्तावित संप/ आंदोलन मिटेपर्यंत ही मूभा राहणार असून, या संदर्भात राज्याच्या गृहविभागाने महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने १६ आॅक्टोबर रोजीच अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे राज्यभरातील खाजगी वाहतूकदारांची दिवाळीच होणार असून, या निर्णयामुळे काही प्रमाणात तरी, प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
कोट: राज्यातील एसटी कर्मचाºयांचा संप लक्षात घेत गृहविभागाने सर्व खाजगी बसगाड्या, स्कूल बसेस, मालवाहू वाहनांना संपमिटेपर्यंत प्रवासी वाहतूक करण्याची मूभा दिली आहे. या संदर्भातील अधिसूचना आमच्याकडे प्राप्त झाली असून, त्याबाबत आमच्या स्तरावर सर्वांना सूचनाही दिल्या आहेत.
-अर्चना गायकवाड
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
वाशिम