पांगरी नवघरे येथे एक रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:52+5:302021-07-07T04:51:52+5:30
०००० केनवड परिसरात पावसाची प्रतीक्षा वाशिम : गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने रिसोड तालुक्यातील केनवड परिसरातील सोयाबीन, मूग, ...
००००
केनवड परिसरात पावसाची प्रतीक्षा
वाशिम : गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने रिसोड तालुक्यातील केनवड परिसरातील सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके संकटात सापडली आहेत. पिकांना संजीवनी मिळण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
००००००००००००
फवारणी करताना दक्षता घेण्याचे आवाहन
वाशिम : कीडनाशक फवारणीतून विषबाधा होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, जहाल कीटकनाशकाची फवारणी टाळावी, असे आवाहन वाशिम पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश भद्रोड यांनी मंगळवारी केले. काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असेही ते म्हणाले.
०००००
रस्त्यावर चिखल; नागरिकांची गैरसोय (फोटो)
वाशिम : मालेगाव तालुक्यातील डही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लागून असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम अर्धवट झाले आहे. हा सिमेंट रस्ता मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यात न आल्याने चिखल होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी मंगळवारी केली.
००००००००००००००
घरकूल अनुदान देण्याची मागणी
वाशिम : रिठद परिसरात विविध योजनेंतर्गत घरकूल बांधकाम करणाऱ्या जवळपास ७४ लाभार्थींना दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मिळाले नाही. याकडे पंचायत समिती प्रशासनाने लक्ष देऊन अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी लाभार्थ्यांनी सोमवारी केली.