पांदण रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचा पाटणी यांचा मानस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:39 AM2021-03-28T04:39:09+5:302021-03-28T04:39:09+5:30
शेतक-यांना शेतात जाण्यासाठी पावसाळयात मोठया प्रमाणात त्रास सहन करून चिखल तुडवत जावे लागत होते. शेतक-यांच्या पांदण रस्त्याची समस्या लक्षात ...
शेतक-यांना शेतात जाण्यासाठी पावसाळयात मोठया प्रमाणात त्रास सहन करून चिखल तुडवत जावे लागत होते. शेतक-यांच्या पांदण रस्त्याची समस्या लक्षात घेता आमदार राजेंद्र पाटणी यांनी पालकमंत्री पांदण रस्ता निधीअंतर्गत मंजुर करून तहसिलदार धिरज मांजरे यांच्या मार्गदर्शनात इंझा, अनई, काजळेश्वर, लोहारा, वापटी, कामरगाव, शेमलाई, यावर्डी, येवता, गणेशपुर, महागाव, उकर्डा, मोरळ, वढवी, पिंपळगाव आदी गावात पोकलनने पांदण रस्त्याच्या कामास सुरवात झाली आहे. पालकमंत्री पांदण रस्ते अंतर्गत आमदार राजेंद्र पाटणी यांनी पुढाकार घेउन कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांच्या उपस्थितीत कामास सुरवात झाली. हा प्रश्न पूर्णत: मार्गी लावण्याचा मानस असल्याचे मत लोहारा येथे उद्घाटनप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष डाॅ राजीव काळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी माजी समाजकल्याण सभापती जयकिशन राठोड, राजीव भेंडे, संजय भेंडे व सरपंच, उपरपंच तसेच ग्राम पंचायत सदस्यांसह महसुल व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.