पाेलिसांची गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:02 AM2021-02-23T05:02:07+5:302021-02-23T05:02:07+5:30
............. हरभरा पिकावर वानरांचा ताव शेलूबाजार : परिसरात हरभरा पिकावर वानरांचे कळप ताव मारत असल्याने शेतकऱ्यांची चिंता ...
.............
हरभरा पिकावर वानरांचा ताव
शेलूबाजार : परिसरात हरभरा पिकावर वानरांचे कळप ताव मारत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा रब्बी पिकांची पेरणी झपाट्याने उरकली. वानरांचे कळप शिवारात धुडगूस घालून हरभऱ्याचे घाटे फस्त करताना दिसत आहेत.
खड्ड्यामुळे वाहनचालकांना त्रास
मालेगाव : मालेगाव-वाशिम आणि मालेगाव-मेहकर या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. समोरून येणाऱ्या वाहनांना साइड देताना चालकांची दमछाक होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.
घरकुल अनुदान रखडले
रिठद : ग्रामीण भागातील विविध योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांचे अनुदान रिठद परिसरातील ५० ते ६० लाभार्थींना मिळाले नाही. लाभार्थींनी लॉकडाऊनपूर्वी घरकुलाचे बांधकाम केले. त्यामुळे अनुदान मिळणे अपेक्षित आहे.