पांदण रस्ते, पुलांच्या निधीचा दुरूपयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:43 AM2021-04-01T04:43:21+5:302021-04-01T04:43:21+5:30
यासंदर्भात इंगोले यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा बांधकाम समिती सभापती डॉ. श्याम गाभणे यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले ...
यासंदर्भात इंगोले यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा बांधकाम समिती सभापती डॉ. श्याम गाभणे यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पांदण रस्ते आणि रस्त्यांवरील पुलांचा निधी या कामांवर खर्चच झालेला नाही. हा निधी समप्रमाणात ५२ जिल्हा परिषद सर्कलमध्ये वाटप व्हायला हवा होता. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. काही विशिष्ट जिल्हा परिषद सर्कलमध्ये निधीचे वितरण करण्यात आले. यामुळे निधीचा दुरूपयोग झाला असून सन २०२०-२१ मधील जिल्हा परिषद सेस फंडातील कामांना स्थगिती देऊन समान निधी वाटप करण्यात यावा, अशी मागणीही जिल्हा परिषद सदस्य अरविंद पाटील इंगोले यांनी केली आहे.
........................
कोट :
पांदण रस्ते व रस्त्यांवरील पुलाच्या विषयासंबंधी जिल्हा परिषद अध्यक्षांशी बोलणे झाले असून त्यांनी १ एप्रिल रोजी ‘मिटींग’ लावली आहे. हा प्रश्न निकाली काढण्याचा शब्द त्यांनी दिलेला आहे.
- अरविंद पाटील इंगोले
जि.प.सदस्य, वाशिम