प्रसिद्ध पर्यटनस्थळ शिरपूरातील अतिक्रमण हटविण्याच्या हालचाली गतीमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 06:17 PM2018-07-25T18:17:41+5:302018-07-25T18:19:26+5:30

मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथील अतिक्रमण हटविण्यास होत असलेल्या विलंबामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान झाल्याची नोटीस जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली.

Paving the to clear encroachments of shirpur jain | प्रसिद्ध पर्यटनस्थळ शिरपूरातील अतिक्रमण हटविण्याच्या हालचाली गतीमान

प्रसिद्ध पर्यटनस्थळ शिरपूरातील अतिक्रमण हटविण्याच्या हालचाली गतीमान

googlenewsNext
ठळक मुद्देमो. इमदाद बागवान यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याविषयी याचिका दाखल केली होती.२१ फेब्रुवारी रोजी निकाल देताना एका महिन्यात अतिक्रमण काढून शिरपूर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथील अतिक्रमण हटविण्यास होत असलेल्या विलंबामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान झाल्याची नोटीस जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली. त्यानुसार, आता अतिक्रमण हटविण्याची हालचाल गतीमान झाली असून बुधवारी भूमि अभिलेख विभागाकडून रस्त्यांची मोजणी करण्यात आली. 
मालेगाव तालुक्यातील शिरपूर हे पर्यटनक्षेत्र आहे. साहजिकच येथे येणाºया पर्यटकांची संख्या देखील मोठी आहे. त्यासाठी असलेल्या रस्त्यावर मात्र मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. ते हटविण्यास कुणीही धजावत नव्हते. दरम्यान, मो. इमदाद बागवान यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याविषयी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या याचिकेवर २१ फेब्रुवारी रोजी निकाल देताना एका महिन्यात अतिक्रमण काढून शिरपूर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान झाल्यासंबंधी वन आणि महसूल विभागाच्या प्रधान सचिवांसह जिल्हाधिकारी, तहसिलदार व सरपंचांना नोटिस बजावण्यात आली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासंदर्भातील प्रक्रियेस सुरूवात केली आहे. त्यानुसार, २५ जुलै रोजी भूमि अभिलेख कार्यालयाच्या विशेष पथकाने शिरपूरात हजेरी लावून प्रत्यक्ष मोजणीस प्रारंभ केला. त्यामुळे आता निश्चितपणे शिरपूरातील अतिक्रमण हटविले जाणार असल्याच्या मुद्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसत आहे. 

वाशिम जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार शिरपूर जैन गावातील रस्त्यांचे मोजमाप सुरू करण्यात आले आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करून प्रशासनाकडे अहवाल सादर केला जाणार आहे. अतिक्रमण हटविण्यासंदर्भात त्यानंतर निर्णय होईल.
- एस.एस.काळे, मोजमाप परिक्षण अधिकारी,भुमि अभिलेख कार्यालय, मालेगाव.

Web Title: Paving the to clear encroachments of shirpur jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.