पांदण रस्ता बंद; शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:25 AM2021-07-12T04:25:25+5:302021-07-12T04:25:25+5:30
धामणी शिवारातील रमेश ठाकरे व संतोष पाटील यांच्या शेतामधून कोंडोलीकडे जाणारा वहिवाटीचा अनेक वर्षांपासून असलेला पांदण रस्ता जमिनीपासून उंच ...
धामणी शिवारातील रमेश ठाकरे व संतोष पाटील यांच्या शेतामधून कोंडोलीकडे जाणारा वहिवाटीचा अनेक वर्षांपासून असलेला पांदण रस्ता जमिनीपासून उंच केल्याने व तेथेच पूल बांधल्याने बंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन तेथे उताराचा रस्ता करून द्यावा, अशी मागणी उपसरपंच सतीश सोनोने, मित्तल धोटे, नीलेश ठाकरे, संतोष पाटील, जगदीश पाटील, गजानन पाटील, दीपक पाटील आदींनी केली आहे.
०००
पावसाळ्यात शेतकऱ्यांची गैरसोय
शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना पांदण रस्ता आवश्यक आहे. पांदण रस्ता जमिनीपासून उंच केल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात चिखल होत असल्याने आणि खडीकरणाचा रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.