कृृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मागण्याकडे लक्ष द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:14 PM2017-11-01T13:14:50+5:302017-11-01T13:15:39+5:30
मंगरुळपीर : यवतमाळ जिल्ह्यामध्ये चुकीच्या पध्दतीने फवारणीमुळे विषबाधा होवुन शेतकरी व शेतमजुरांचा दुदैवी मृत्यु झालेत. व यामध्ये काही शेतकरी बाधीत सुध्दा झाले. या दुर्देवी घटनेचे दु:ख आम्हाला झाले असुन याबाबत केवळ कृषी निविष्ठा विक्रेतेच दोषी असल्याचा प्रचार, प्रसार होत असुन आम्हाला आमचा व्यवसाय करणे कठीण झाले आहे. तरी शासनाने आमच्या उपरोक्त मागण्या पूर्ण करा अन्यथा येत्या दोन २ नोव्हेंबरपासून आमचे कृषी निष्ष्ठा विक्री केंद्रे बंद ठेवणार असल्याचे निवेदन मंगरुळपीर तालुका कृषी व्यावसायीक संघटनेने येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार ,कृषी अधिकारी व ठाणेदारांना ३१ आॅक्टोंबर रोजी दिले.
शेतकरी व शेतमजूरांचे पिकावर फवारणी करतांना व चुकीच्या पध्दतीने फवारणीमुळे किटकनाशक औषधामुळे विषबाधा होवुन मृत्यु झाल्याच्या घटना यवतमाळ जिल्ह्यांमध्ये झाल्यात आणि या सर्व प्रकाराला केवळ कृषी निविष्ठा विक्रेतचे दोषी असल्याचा प्रचार ,प्रसार विविध राजकीय संघटनांकडून केल्या जात आहे. त्यामुळे कृषी विक्रेत्यांस जबाबदार धरुन त्यांचेवर कृषी विभागामार्फत पोलिस कारवाई,विक्री परवाना रद्द करणे , विक्री बंद आदेश देणे अशा गंभीर स्वरुपाची कारवाई करण्यात येत आहेत. अशा परिस्थिती मध्ये आम्ही आमचे व्यवसाय कसे करावे असे निवेदनात नमुद असुन प्रशासनाने आमच्या मागण्याची पुर्तता करावी यामध्ये ज्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल करण्यात आले ते मागे घेण्यात याव. तसेच े विक्री परवाने पुर्ववत देण्यात यावे, आॅनलाइृन परवान्यात समाविष्ठ केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात यावेत व परवान्यामध्ये किटकनाशकाचे उगम प्रमाणपत्र दाखल करण्यात करीता मुदत देण्यात यावी, शासनाकडून सर्व किटकनाशक,उत्पादक कंपन्यांना त्यांचे उगम प्रमाणपत्र कृ षी विक्रेत्यांना देणे बंधनकारक करावे. कृषी विक्रेत्याकडील बियाणे, किटकनाशके व खते यांचे हस्तलिखीत साठा ऐवजी संगणकीय पध्दतीने ठेवण्यात आलेले साठा रजिस्टर ग्राह्य धरण्यात यावे व इतर मागण्याकडे शासनाने विचार करुन मांगण्याची पुर्तता करावी अशी मागणी केली आहे. यावेळी येथील उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांनी कृषी सेवा संचालकांना शेतकºयांना औषधे देतांना नियमावलीचे परिपत्रक देण्याचे सांगितले तर तहसीलदार वैशाख वाहुरवाघ व कृषी अधिकारी शेळके यांनी तहसील कार्यालयातच कृषी सेवा संचालकांची बैठक होवुन काही बाबींबद्दल माहिती देवुन कृषी निविष्ठा विक्रेते व शेतकरी यांनी आपसामध्ये समन्वय साधावे जेणे करुन पुढे होणाºया घटनांवर अंकुश बसणार असल्याचे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ व कृषी अधिकारी शेळके यांनी बैठकीत सांगितले. यामध्ये संघटनेचे अध्यक्ष देवा राठोड, सचिव शारिक शेख, अनिल बाहेती, दत्ताभाऊ भेराणे, बबलु बाहेती, रवि आसावा, संतोष बियाणे, नरेश ठाकरे, अनिल पोटकटारे, हरिष पवार, गोपाल म्हातारमारे, निलेश राऊत, अमोल सावदे, अंकुश मोटे, राजु भांगडीया, ठाकरे यांचेसह तालुक्यातील सर्वच कृषी निविष्ष्ठ विक्रेत्यांच्या निवेदनावर स्वाक्षºया असुन ते उपस्थित होते.