वेतन संरचना, वेतन निश्चितीसाठी विशेष शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:30 PM2019-03-01T12:30:14+5:302019-03-01T12:30:22+5:30
वाशिम : सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन संरचना व वेतन निश्चिती करण्यासाठी खासगी लेखाधिकारी अव्वाच्या सव्वा शुल्क आकारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन संरचना व वेतन निश्चिती करण्यासाठी खासगी लेखाधिकारी अव्वाच्या सव्वा शुल्क आकारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पृष्ठभूमीवर शिक्षण विभागातील लेखाधिकाºयांनी विशेष शिबिर आयोजित करावे, असे निर्देश अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांनी विभागातील सर्व शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत.
७ व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन संरचना व वेतन निश्चिती करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक ए.एस.पेंदोर यांनी शिक्षण विभागातील लेखाधिकारी यांना द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पेंदोर यांनी उपरोक्त आदेश दिले आहेत. वेतन निश्चिती करताना बाहेरील खाजगी लेखाधिकारी भरमसाठ शुल्क आकारु शकतात व त्याचा भुर्दंड शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सहन करावा लागु शकतो, अशी भीतीही वर्तविण्यात येत होती. शालेय शिक्षण विभागाने २२ फेब्रुवारी २०१९ रोजी शासन निर्णय निर्गमीत केला असुन, त्या प्रमाणे वेतन निश्चिती करण्याबाबत शिक्षकांची होणारी आर्थिक लूट टाळण्यासाठी व थांबवण्यासाठी लेखाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना शिबिराचे आयोजन करण्याबाबत आदेशीत करण्यात यावे अशी मागणी केली होती. शिक्षण उपसंचालक ए.एस. पेंदोर यांनी यावर त्वरित कार्यवाही करीत विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाºयंना दिले. त्यानुसार आता विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.