तुरीच्या चुकाºयातील ६० कोटी शेतकºयांना अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:37 PM2017-10-07T13:37:01+5:302017-10-07T13:37:09+5:30

Paying for 60 crore farmers of the state's mistakes | तुरीच्या चुकाºयातील ६० कोटी शेतकºयांना अदा

तुरीच्या चुकाºयातील ६० कोटी शेतकºयांना अदा

Next
ठळक मुद्देउर्वरित रक्कमही लवकरच मिळणार

वाशिम: बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत २६ जुलै ते ३१ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील १० हजार ९५ टोकनधारक शेतकºयांकडून खरेदी करण्यात आलेल्या १ लाख ६९ हजार ७८0 क्विंटल तुरीचे प्रलंबित असलेल्या चुकाºयातील ८५ कोटी ७३ लाख रुपयांपैकी ६३ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले. त्यानंतर गत तीन दिवसांतच यातील ६० कोटींच्या रकमेचे चुकारे शेतकºयांना अदा करण्यात आले आहे. उर्वरित २२ कोटींची रक्कमही येत्या तीन दिवसांत प्राप्त होणार असून, त्याचे वितरण लवकरच करणार असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले. 

शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत शिल्लक राहिलेल्या टोकणधारक शेतकºयांची तूर २६ जुलै ते ३१ आॅगस्टपर्यंत खरेदी करून घेतली.  या कालावधित जिल्ह्यात २६ जुलैपासून हमीभावाने  एक लाख ६९ हजार ७८० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. तथापि ही तूर विकणाºया शेतकºयांना चुकाºयापोटी देणे असलेले ८५ कोटी ७३ लाख ८९ हजार रुपये थकित होते. याअनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव सादर करून तुरीचे रखडलेले चुकारे अदा करण्यासाठी रकमेची मागणी केली. महिनाभरानंतर पणन महासंघाच्यावतीने अकोला आणि वाशिम असे दोन्ही जिल्हे मिळून शासकीय खरेदीतील रखडलेले चुकारे अदा करण्यासाठी १४१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यातील ६३ कोटीची रक्कम वाशिम जिल्ह्यास प्राप्त झाली.  या रकमेतून शासकीय खरेदी केंद्रावर तूर विकणाºया शेतकºयांना चुकारे अदा करण्यासाठी खरेदीविक्री समित्यांमार्फत रविवार आणि सोमवार या सुटीच्या दिवशी धनादेश तयार करण्यात आले आणि मंगळवार ३ आॅक्टोबरपासून या चुकाºयाचे वाटप सुरू करून गत तीन दिवसांत त्यामधील ६० कोटी रुपयांचे वितरण शेतकºयांना करण्यात आले.  

Web Title: Paying for 60 crore farmers of the state's mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.