तक्रारकर्त्यास नुकसानभरपाई द्यावी
By Admin | Published: September 1, 2015 01:41 AM2015-09-01T01:41:39+5:302015-09-01T01:41:39+5:30
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचचा आदेश.
वाशिम : जिल्हा परिषदेमध्ये अधिपरिचारिका म्हणून कार्यरत असताना राज्य शासनाच्या आरोग्य सेवेंतर्गत अकोला सर्कलमध्ये सामावून घेतल्यानंतर भविष्य निर्वाह निधीची रक्कम दोन लाख ९९ हजार ४९३ रुपयांचे चलान व धनादेश गहाळ करणार्या स्टेट बँक इंडियाने तक्रारकर्ती उषा सुरेंद्र वानखेडे यांना व्याजासह सेवेत कसुर केल्याबद्दल आठ हजार रुपये नुकसानभरपाई अदा करावी, असा आदेश जिल्हा ग्राहक निवारण न्याय मंचने २७ ऑगस्ट रोजी दिला. सप्तश्रृंगी अपार्टमेंट हिंगणा फाटा अकोला येथील उषा सुरेंद्र वानखेडे यांनी ३ जुलै २0१४ रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचकडे भारतीय स्टेट बँक शाखा वाशिम व जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. वाशिम यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत उषा वानखेडे यांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कम दोन लाख ९९ हजार ४९३ रुपयाचे चलान व धनादेश क्रं. १0१७१८ दि. २६ मे २0१0 ला भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक पीएचबीएन १९२३६ मध्ये जमा करण्याकरिता दिला होता; मात्र सदर चलान भारतीय स्टेट बँक शाखा वाशिम यांच्याकडून गहाळ झाल्यामुळे आ पणास ८.५ टक्के दराने ६१५२0 रुपये व्याज तसेच येण्या-जाण्याच्या खर्चाचे ८४८0 रुपये, आर्थिक व मानसिक त्रासाबद्दल २४ हजार रुपये देण्याचा आदेश व्हावा व तक्रारीचा खर्च पाच हजार रुपये विरुद्ध पक्षाकडून वसूल करुन आपणास मिळावे, असे नमूद केले होते. या प्रकरणी न्यायमंचच्या अध्यक्ष एस.एस. उंटवाले, सदस्य जे.जी.खांडेभराड व सदस्य ए.सी. उकळकर यांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर भारतीय स्टेट बँकेने तक्रारकर्ते उषा वानखेडे यांना दोन लाख ९९ हजार ४९३ रुपयांवर ४ जून २0१0 ते २७ नोव्हेंबर २0१२ पर्यंतचे दरसाल दरशेकडा ८ टक्के दराने व्याज द्यावे. तसेच सेवेतील न्यूनतेपोटी नुकसानभरपाई व प्रकरणाचा न्यायिक खर्च मिळून रु पये आठ हजार द्यावे, असा आदेश दिला. तक्रारकर्त्यातर्फे अँड. मनोज वानरे व अँड.उंडाळ यांनी काम पाहिले.