रोहयोच्या कामाची देयके प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:12 AM2021-01-08T06:12:46+5:302021-01-08T06:12:46+5:30
^^^^ पोकरा अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन कामरगाव: महाराष्ट्र शासन व जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ५ जानेवारी ...
^^^^
पोकरा अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कामरगाव: महाराष्ट्र शासन व जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ५ जानेवारी रोजी कामरगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील अडचणी जाणून घेत त्या दूर करण्यासह पोकरा प्रकल्पातील विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
--------------
रखडलेल्या कामामुळे वाहनधारक त्रस्त
आसेगाव: वाशिम ते मंगरुळपीर दरम्यानच्या महामार्गावर दस्तापूरनजिक १०० मीटर अंतराचे काम गेल्या दोन वर्षांपासून अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, या ठिकाणी वर्षभरात आठ अपघात घडले आहेत. त्यामुळे हे काम त्वरित करण्याची मागणी होत आहे.
----------------
नाल्यांच्या सफाईबाबत उदासीनता
आसोला खु : मानोरा तालुक्यातील आसोला खु. येथे नाल्यांची साफसफाई करण्याबाबत ग्रामपंचायत उदासीन असल्याने गुरुवारी सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसले. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासन मात्र अद्यापही नाल्यांच्या सफाईबाबत उदासीन आहे.
---
पुलाची उंची धोकादायक
तळप बु.: मानोरा ते दिग्रस रोडवरील बेलोरा येथील खोराडी नाल्यावरील पुलाची उंची कमी आहे. त्यातच पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे नाल्यास पूर येऊन पुलाचा बराच भाग खचला. यामुळे अपघाताची भीती आहे. बांधकाम विभागाने या प्रकाराची दखल घेऊन या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.