वाशिम जिल्ह्यात सरपंच-उपसरपंचांची निवड शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:49 AM2021-02-17T04:49:08+5:302021-02-17T04:49:08+5:30

जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक गतमहिन्यात पार पडली. त्यापैकी ७५ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवडणूक सोमवार १५ फेब्रुवारीला पार पडली. त्यात ...

Peaceful election of Sarpanch-Deputy Sarpanch in Washim district | वाशिम जिल्ह्यात सरपंच-उपसरपंचांची निवड शांततेत

वाशिम जिल्ह्यात सरपंच-उपसरपंचांची निवड शांततेत

Next

जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक गतमहिन्यात पार पडली. त्यापैकी ७५ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवडणूक सोमवार १५ फेब्रुवारीला पार पडली. त्यात वाशिम तालुक्यातील १२, मंगरूळपीर तालुक्यातील १३, कारंजा तालुक्यातील १४, मानोरा तालुक्यातील ९, रिसोड तालुक्यातील १७ आणि मालेगाव तालुक्यातील १० ग्रामपंचायतींचा समावेश होता. त्यानंतर मंगळवारी ६३ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. त्यात कारंजा तालुक्यातील १४, वाशिम तालुक्यातील १२, मंगरुळपीर तालुक्यातील १२, रिसोड तालुक्यातील १७, मालेगाव तालुक्यातील १० आणि मानोरा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

---------

वाशिम तालुक्यातील १२ सरपंच, उपसरपंचाची निवड

प्रक्रिया शांततेत : प्रत्येक ठिकाणी निवडणूकच

वाशिम : तालुक्यातील निवडणूक पार पडलेल्या १२ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी (दि. १६) पार पडली. प्रत्येक ठिकाणी एकापेक्षा अधिक दावेदार असल्याने निवडणुकीच्या आधारेच सरपंच, उपसरपंच जाहीर करण्यात आले.

वाशिम तालुक्यातील निवडणूक पार पडलेल्या ९ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक सोमवारी पार पडली, तर मंगळवारी १२ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. त्यात अडोळी सरपंचदपदी सविता ज्ञानेश्वर इढोळे, तर उपसरपंच पदी भगवान भानुदास इढोळे, टो ग्रामपंचायतच्या सरपंच पदी माधुरी सारंगधर काकडे, तर उपसरपंचपदी रमेश भिकाजी काकडे, तामसीच्या सरपंचपदी ज्योती अर्जुन कव्हर, तर उपसरपंचपदी रामकिसन बबन कव्हर, पिंपळगाव सरपंचपदी सुधाकर मसाजी मानमोठे, तर उपसरपंचपदी मुरलीधर विश्वनाथ निरगुडे, वारा जहाँगीर सरपंचपदी सुगंधाबाई पुंजाजी कांबळे, तर उपसरपंचपदी खा. हाफिजाबी अजिज खा, काटा सरपंचपदी जया राममकिसन मोरे, तर उपसरपंचपदी अनिता चक्रधर कंकणे, पार्डी टकमोर सरपंचपदी लता प्रमोद खोरणे, तर उपसरपंचपदी गजानन सखाराम कांबळे, किनखेडा वारा जहॉंगीर सरपंचपदी सुजाता सुनील लांडकर, तर उपसरपंचपदी चित्रा संतोष लांडकर, तोरणाळा सरपंचपदी ताई जगदेव सावके, तर उपसरपंचपदी विजयमाला महादेव कंकाळ, तोंडगाव सरपंचपदी चंदा बाळासाहेब गोटे, तर उपसरपंच पदी गजानन रामचंद्र गोटे, भोयता सरपंच पदी रुख्मिना संजय खंडारे, तर उपसरपंचपदी संतोष दत्तात्रय गावंडे, तसेच वारला सरपंचपदी पुनैरया गणपत नप्ते, तर उपसरपंचपदी उत्तम शामराव मस्के यांची निवड झाली.

---------

चोख बंदोबस्तात पार पडली प्रक्रिया

वाशिम तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीदरम्यान गोंधळ उडू नये म्हणून महसूल प्रशासनाकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनीही या निवडणूक प्रक्रियेसाठीर नियोजित ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.

Web Title: Peaceful election of Sarpanch-Deputy Sarpanch in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.