पीक कर्ज वितरणातील दिरंगाई खपवून घेणार नाही!

By Admin | Published: July 19, 2016 02:19 AM2016-07-19T02:19:51+5:302016-07-19T02:19:51+5:30

किशोर तिवारी यांनी घेतला खरीप पीक कर्ज वितरणाचा आढावा.

Peak will not tolerate disbursement of debt! | पीक कर्ज वितरणातील दिरंगाई खपवून घेणार नाही!

पीक कर्ज वितरणातील दिरंगाई खपवून घेणार नाही!

googlenewsNext

वाशिम : अद्यापही पीक कर्जाचा लाभ न घेतलेल्या पात्र गरजू शेतकर्‍यांना बँकांनी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना देतानाच ३१ जुलैपर्यंत कर्ज वाटपातील दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशारा कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिला. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खरीप पीक कर्ज आढावा बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. एस. मेहता, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह सर्व तहसीलदार, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ना. तिवारी म्हणाले, की वाशिम जिल्ह्यातील बँकांनी खरीप पीक कर्ज वितरणात चांगली कामगिरी केली आहे. मात्र अद्यापही काही बँकांच्या कर्ज वितरणाचे प्रमाण असमाधानकारक आहे. या बँकांनी ३१ जुलै २0१६ पयर्ंत त्यांच्याकडे येणार्‍या पात्र गरजू शेतकर्‍यांना जास्तीत जास्त पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार वाशिम जिल्ह्यात खरीप पेरणीपूर्वी ७0 टक्के पेक्षा अधिक पीक कर्जाचे वितरण पूर्ण करण्यात आले होते. जिल्हा प्रशासन व बँकांनी केलेल्या या कामगिरीचे ना. तिवारी यांनी यावेळी कौतुक केले. तसेच यापुढेही गरजू पात्र शेतकर्‍याला बँकांनी पीक कर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे, पीक कर्ज वितरणातील दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशारा तिवारी यांनी दिला.
पीक कर्ज वाटप आणि पुनर्गठन याबाबत बँकांनी सतर्क राहून शेतकर्‍यांना सुलभरीत्या सुविधा द्याव्यात, असेही ना. तिवारी म्हणाले. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी यापूर्वी तालुकास्तरीय बैठका घेऊन व्यापक जनजागृती केल्याने आता उद्दिष्टपूर्ती होत असल्याची बाब प्रशासनाने निदर्शनात आणून दिली.

Web Title: Peak will not tolerate disbursement of debt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.