पादचारी मार्गावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:31 AM2021-02-19T04:31:40+5:302021-02-19T04:31:40+5:30

.............. पुलाचे काम सुरू करण्याची मागणी कारंजा : पिंपळगाव ते इंझोरी या पाणंद रस्त्यावरील पूल अडीच वर्षांपूर्वी पुरात ...

Pedestrian encroachment | पादचारी मार्गावर अतिक्रमण

पादचारी मार्गावर अतिक्रमण

Next

..............

पुलाचे काम सुरू करण्याची मागणी

कारंजा : पिंपळगाव ते इंझोरी या पाणंद रस्त्यावरील पूल अडीच वर्षांपूर्वी पुरात वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्न केल्यानंतर तीन विभागांच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी व मोजमाप केले. परंतु, पुलाचे काम सुरू झाले नाही. ते सुरू करण्याची मागणी हाेत आहे.

....................

बाजारात तुरीची आवक वाढली

शेलुबाजार : गेल्या आठवडाभरापासून तुरीच्या दरात सतत वाढ होत असल्याने शेतकरी उत्साहित आहेत. त्यामुळे बाजार समितीत तुरीची आवकही वाढत असलचे दिसून येत आहे.

..............

नाल्या सफाईअभावी आरोग्याला धोका

कारंजा : कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड येथे नाल्यांची सफाई करण्याबाबत ग्रामपंचायत उदासीन असल्याने गुरुवारी सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसले. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. संबधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Pedestrian encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.