‘उघड्यावर’ जाणार्‍या ५९0 जणांवर दंडात्मक कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:13 AM2017-08-10T01:13:22+5:302017-08-10T01:13:45+5:30

वाशिम: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाशिम जिल्हा परिषदेच्यावतीने  बुधवार, ९ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील निवडक २५५  गावांमध्ये ‘मेगा गुड मॉर्निंग’ मोहीम राबवून ‘खुले में शौच से  आजादी’, या जनजागृती अभियानास प्रारंभ करण्यात आला. 

Penalties for 590 going to the 'open' | ‘उघड्यावर’ जाणार्‍या ५९0 जणांवर दंडात्मक कारवाई!

‘उघड्यावर’ जाणार्‍या ५९0 जणांवर दंडात्मक कारवाई!

Next
ठळक मुद्दे२५५ गावांमध्ये धडक ‘खुले मे शौच से आझादी’ उपक्रमास प्रारंभ‘खुले मे शौच से आझादी’ उपक्रमास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाशिम जिल्हा परिषदेच्यावतीने  बुधवार, ९ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील निवडक २५५  गावांमध्ये ‘मेगा गुड मॉर्निंग’ मोहीम राबवून ‘खुले में शौच से  आजादी’, या जनजागृती अभियानास प्रारंभ करण्यात आला. 
या मोहिमेद्वारे एकाच दिवशी २५५ गावांमध्ये गुड मॉनिर्ंग पथक  धडकले आणि उघड्यावर जाणार्‍या तब्बल ५९0 लोकांना पकडून  दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी गणेश पाटील यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या या  विशेष मोहिमेने जिल्ह्यातील गावांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 
मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्याअखेर वाशिम जिल्हा परिषदेने  जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी-एकाच वेळी गुड  मॉनिर्ंग पथकाची ‘एण्ट्री’ करून उघड्यावर  जाणार्‍यांविरूद्ध धडक  कारवाई केली होती. तेव्हा या उपक्रमाची सर्वत्र चांगलीच चर्चा झाली  होती. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्हा हगणदरीमुक्त  करण्यासाठी  राबविण्यात येत असलेल्या अभिनव उपक्रमाने जिल्हा  ढवळून निघाला आहे. आता पुढील दोन महिन्यात जनजागृती मोहीम  अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छ भारत  मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी दिली. 
दरम्यान, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कर्मचार्‍यांचे वेगवेगळे ‘गुड  मॉर्निंग’ पथक तयार करून बुधवारी भल्या पहाटे ते २५५ गावांमध्ये  शिरविण्यात आले. पथक गावात आल्याचे कळताच उघड्यावर  शौचविधी उरकणारी काही मंडळी परत घरी जाऊ लागली; तर काही  लोकांचा पाठलाग करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात  आली.   जिल्हा परिषदेने राबविलेल्या या विशेष मोहीमेचे संनियंत्रण   इस्कापे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश  राठोड यांनी केले. 
कारंजा तालुका आणि इतर पाच तालुक्यातील हगणदरीमुक्त गावे  वगळून उर्वरित २५५ ग्रामपंचायतीत ही मोहीम राबविण्यात आली. या  मोहिमेला यशस्वी करण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे  सर्व सल्लागार, मिनी बीडीओ आणि तालुका स्वच्छता मिशनचे गट  समन्वयक  यांनी परिश्रम घेतले. 

Web Title: Penalties for 590 going to the 'open'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.