छळप्रकरणी पतीसह सासरच्यांना दंड

By admin | Published: December 20, 2014 12:59 AM2014-12-20T00:59:12+5:302014-12-20T00:59:12+5:30

वाशिम येथील प्रकार; तीनही आरोपींना प्रत्येकी दहा हजार रूपयांचा दंड.

Penalties for husband-in-law with harsh treatment | छळप्रकरणी पतीसह सासरच्यांना दंड

छळप्रकरणी पतीसह सासरच्यांना दंड

Next

वाशिम: घर बांधण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी करुन शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी दोषी आढळून आलेल्या आरोपी पतीसह सासरच्या मंडळींना तीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा आदेश येथील मुख्य न्यायदंडाधिकारी प्रवीण व्ही. चतुर यांनी १९ डिसेंबर रोजी दिला.
फिर्यादी उषा राहुल सोनोने ह.मु. किनखेडा या विवाहितेने १0 डिसेंबर २0१३ रोजी दुपारी दोन वाजता अनसिंग पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. सदर फिर्यादीमध्ये उषा सोनोने यांनी पती राहुल वसंता सोनोने व सासरच्या मंडळींनी घर बांधण्यासाठी माहेरहून एक लाख रुपयांची मागणी करून आपला शारीरिक व मानसिक छळ केला व जिवे मारण्याची धमकी दिली, असे नमूद केले. उषा सोनोने यांच्या फिर्यादीवरून अनसिंग पोलिसांनी आरोपी पती राहुल सोनोने वय ३४ कलावती वसंता सोनोने वय ६५ व कुसूम राजू ठाकरे वय ३८ सर्व राहणार फाळेगाव थेट, प्रतिभा अरविंद मनवर वय ४५ रा. वनोजा मंगरुळपीर, रमा ज्ञानदेव काजळे वय ४0, संगीता अरुण काजळे वय ३५ व ज्योती वसंता मनवर वय ३0 सर्व राहणार काजळांबा या सात जणांविरुद्ध कलम ४९८ अ, ५0६-३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास जमादार रमेश चव्हाण यांनी पूर्ण करुन प्रकरण न्यायप्रविष्ट केले. मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने याप्रकरणी एकूण सात साक्षीदार तपासले. साक्षी-पुराव्यावरून दोषी आढळून आल्यामुळे न्यायाधीश प्रवीण चतुर यांनी कलम ४९८ (अ) आरोपी पती राहुल सोनोने, कलावती सोनोने व कुसूम ठाकरे या तिघांना प्रत्येकी दहा हजार रुपये असा दंड ठोठावला. दंड न भरल्यास प्रत्येकी तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अँड. कुमूद पेठकर यांनी बाजू मांडली.

Web Title: Penalties for husband-in-law with harsh treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.