अवैध गौण खनिज वाहतूकप्रकरणी साडेतीन लाखांचा दंड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 04:48 PM2018-12-23T16:48:26+5:302018-12-23T16:50:15+5:30
मानोरा तहसिलदारांची कारवाई : अवैध गौण खनिज वाहतुकदारांचे धाबे दणाणले लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा ( वाशिम ) : गौण ...
मानोरा तहसिलदारांची कारवाई : अवैध गौण खनिज वाहतुकदारांचे धाबे दणाणले
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : गौण खनिजाची अवैध वाहतुक करणाºया तीन ट्रॅक्टरधारकांविरूद्ध मानोरा तहसिलदारांनी शनिवारी कारवाई केली. प्रत्येकाकडून १.१६ लाख या प्रमाणे जवळपास ३.५० लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात येईल, अशी माहिती तहसिल प्रशासनाने दिली. यामुळे गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाºया वाहतूकदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
गौण खनिजाचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकजण शासनाची परवानगी न घेता चोरट्या मार्गावर बिनधास्त गौण खनिजाची वाहतुक करीत असल्याचे वास्तव आहे. गौण खनिजाची अवैध वाहतुक रोखण्यासाठी तहसील कार्यालयाने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. तालुक्यातील विठोली येथे गौण खनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर मानोराचे तहसिलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी शनिवारी पकडून मानोरा पोलीस स्टेशनच्या आवारात लावले. एम एच.एल ९१०९, एम.एच.ए. ६१०६ व एका नंबर नसलेल्या ट्रॅक्टरचा यामध्ये समावेश आहे. अवैध गौण खनिज वाहतुक करणाºया ट्रॅक्टरला प्रत्येकी एक लाख १६ हजार रूपयाच्या वर दंड ठोकण्यात येईल अशी माहिती तहसिलदार चव्हाण यांनी दिली. या कारवाईमुळे गौण खनिजाची अवैध वाहतुक करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.