विनामास्कप्रकरणी दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:07 AM2021-05-05T05:07:12+5:302021-05-05T05:07:12+5:30
०००० सभापतींनी घेतला आरोग्याचा आढावा वाशिम : ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाल्याने ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी, ...
००००
सभापतींनी घेतला आरोग्याचा आढावा
वाशिम : ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाल्याने ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी, गृहविलगीकरणाची व्यवस्था, कोरोना लसीकरण, प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची तपासणी आदी मुद्यांच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी सोमवारी ऑनलाईन पद्धतीने आरोग्य विभागाचा आढावा घेतला.
००००
बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी
वाशिम : रिसोड तालुक्यातील करडा येथील पाच जणांना कोरोना संसर्ग असल्याचे निदान सोमवारी झाले. आरोग्य विभागाने या सर्वांच्या हायरिस्क संपर्कातील व्यक्तींची तातडीने माहिती घेऊन त्यांची कोरोना चाचणी सुरू केली आहे.
०००
शौचालय बांधकामे प्रभावित
वाशिम : सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शौचालय बांधकामे प्रभावित होत आहेत. कोरोनाचा आलेख खाली आल्यानंतर शौचालयाच्या कामांना गती मिळण्याचे संकेत आहेत.
००००००
रिसोड तालुक्यात वीज पुरवठ्यात व्यत्यय
वाशिम : गत तीन दिवसापासून रिसोड तालुक्यातील काही भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. वीज पुरवठा सलग सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांनी सोमवारी केली.
०००००००