प्रलंबित मागण्यासांठी दिव्यांगांचे चारदिवसांपासून अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 06:35 PM2019-02-28T18:35:32+5:302019-02-28T18:35:49+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत मंगरुळपीर तालुक्यातील दिव्यांगांनी अन्नत्याग आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.

For the pending demands, Dayanigang's stirring movement for four days | प्रलंबित मागण्यासांठी दिव्यांगांचे चारदिवसांपासून अन्नत्याग आंदोलन

प्रलंबित मागण्यासांठी दिव्यांगांचे चारदिवसांपासून अन्नत्याग आंदोलन

googlenewsNext

वाशिम: गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत मंगरुळपीर तालुक्यातील दिव्यांगांनी अन्नत्याग आंदोलनाचा पावित्रा घेतला असून, मंगरुळपीर पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवार २५ फेब्रुवारीपासून दोन दिव्यांग बांधवांनी हे आंदोलन सुरू केले आहे. गुरुवार २८ फेबु्रवारी रोजी चौथ्या दिवशीही हे आंदोलन सुरूच होते. दरम्यान, गटविकास अधिकाºयांनी या आंदोलनस्थळी भेट देऊन समस्या सोडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले; परंतु लेखी आश्वासनानंतरच आश्वासन मागे घेण्याचा निर्धार या दिव्यांगानी व्यक्त केला आहे. 
राज्य व केंद्र शासन दिव्यांगांसाठी विविध योजना आणत आहे; परंतु त्या योजनांच्या प्रभावी अमलबजावणीबाबत प्रशासन उदासीन असल्याने दिव्यांगांची मोठी हेळसांड होऊन ते योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत. स्थानिकस्वराज्य संस्थांच्या अंदाजपत्रकात ५ टक्के निधी हा दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी खर्च करण्याची तरतुद आहे. तथापि, या निधीचाही पूर्णपणे वापर होत नसल्याचे दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाही दिव्यांगांच्या नोंदणीबाबतही प्रचंड उदासीन दिसत आहेत. एवढेच नव्हे, तर लघुउद्योगासाठी दिव्यांगांना २०० फुट भूखंड देण्याचे शासन आदेश असतानाही त्याची अमलबजावणी होत नाही. शेकडो दिव्यांगांना पेन्शन वाढीचाही लाभ देण्यात आला नाही आणि घरकुल योजनेचा आराखडाही तयार केला नाही. अपंगत्वामुळे शारीरिक क्षमतेवर मर्यादा येत असल्याने दिव्यांगांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, मात्र त्याचीही दखल घेतली जात नाही, अशा विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी दिव्यांगांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनही पाठविले असून, या निवेदनावर दिव्यांग सेवा समिती विदर्भ अध्यक्ष सुभाष इंगोले, मोबीसिंग राठोड यांच्यासह तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधवांच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: For the pending demands, Dayanigang's stirring movement for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम