वारा जहॉगिर प्रकल्पबाधितांची ससेहोलपट; भूसंपादन मोबदल्यासह अनेक प्रश्न प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 06:03 PM2019-02-20T18:03:03+5:302019-02-20T18:03:43+5:30

देपूळ (वाशिम) : येथून जवळच असलेल्या वारा जहॉगिर येथे शेतकºयांचे सिंचन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी मिळण्यात अडचणी असताना भूसंपादन मोबदला, अतिरिक्त बाधीत जमिनीचा मोबदला, पर्यायी रस्ता, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे हा प्रकल्प शेतकºयांसाठी फायद्याऐवजी डोके दुखी ठरत आहे

Pending many questions with land acquisition of irrigation project | वारा जहॉगिर प्रकल्पबाधितांची ससेहोलपट; भूसंपादन मोबदल्यासह अनेक प्रश्न प्रलंबित

वारा जहॉगिर प्रकल्पबाधितांची ससेहोलपट; भूसंपादन मोबदल्यासह अनेक प्रश्न प्रलंबित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
देपूळ (वाशिम) : येथून जवळच असलेल्या वारा जहॉगिर येथे शेतकºयांचे सिंचन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी मिळण्यात अडचणी असताना भूसंपादन मोबदला, अतिरिक्त बाधीत जमिनीचा मोबदला, पर्यायी रस्ता, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे हा प्रकल्प शेतकºयांसाठी फायद्याऐवजी डोके दुखी ठरत आहे
लघू पाटबंधारे विभाग वाशिमच्यावतीने वारा जहॉगिर येथे प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पासाठी शेतकºयांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. याबाबतचे भूसंपादन प्रस्ताव वाशिम जिल्हाधिकाºयांनी मंजुरही केले. त्यामुळे शेतकºयांना मोबदला मिळणे अपेक्षीत होते; परंतु चार महिने उलटले तरी शेतकºयांना मोबदला मिळाला नाही. त्याशिवाय शेतकरी विधवा, आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे भूसंपादन, अतिरिक्त बाधीत जमिनीचा मोबदला, पर्यायी रस्ता, गाळपेर कर पावत्या, भूभाडे, प्रस्तावही पाटबंधारे विभागाकडे प्रलंबित आहेत. या सर्व प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याकडे शेतकºयांनी निवेदन सादर करून न्याय देण्याची मागणी केली. त्यावर उपरोक्त अधिकाºयांनी या निवेदनाच्या प्रती सदर प्रकल्पाची देखरेख आणि इतर जबाबदारी असलेल्या लघू पाटबंधारे  उपविभागीय कार्यालय मालेगावकडे पाठवित चौकशी करून कार्यवाहीचे आदेशही दिले. तथापि, या पत्राला दोन महिने उलटले तरी, त्यावरची धुळही पाटबंधारे मालेगावच्या उपविभागीय अभियंत्यांनी झटकलेली नाही.  वारा प्रकल्पाच्या जलाशयात उमरा शमशोद्दिन शिवारातील २२ शेतकºयांची जमीन बाधीत झाली. त्याची संयुक्त मोजणी २०१६ ला झाली आणि त्याचा मोबदला निश्चिती प्रस्ताव वारा सिंचन प्रकल्पाच्या जलाशयामध्ये २०१५ पासुन उमरा शम शिवारातील २२ शेतकºयांची अतिरिक्त जमीन बाधीत झाली. त्याची संयुक्त मोजणी २०१६ ला झाली तर त्याचा मोबदला निश्चिती प्रस्ताव जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत चार महिन्यांपूर्वी मंजूर झाला. तथापि, शेतकºयांना सरळ खरेदीव्दारे मोबदला देण्यास पाटबंधारे उपविभागीय कार्यालय मालेगावकडून टाळाटाळ होत आहे. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांनी शेतकºयांना हा मोबदला त्वरीत मिळावा म्हणून नागपूर महामंडळाकडे पाठपुरावा करून निधीही उपलब्ध करून घेतला; परंतु पाटबंधारे उपविभाग मालेगाव मात्र, शेतकºयांचा प्रश्न निकाली काढण्यात उदासीन आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पात देपूळच्या २० शेतकºयांची आणि उमरा शमशोद्दिनच्या चार शेतकºयांची आणखी बाधीत होत आहे. तथापि, त्याची संयुक्त मोजणी झालेली नाही. 

उमरा शम येथील बाधीत शतकºयांच्या जमीनीचा मोबदला तात्काळ मिळावा याकरिता मी स्वत: विदर्भ पाटबंधारे महामंडळाकडे पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन दिला. त्या शेतकºयांना त्वरित मोबदला देण्याचे लेखी कळविले असून, विविध प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्याच्या सुचना मालेगाव उपविभागीय कार्यालयाला देण्यात येतील. कळवितो
-प्रमोद मांदळे, अधिक्षक अभियंता, लघू पाटबंधारे विभाग, वाशिम.

Web Title: Pending many questions with land acquisition of irrigation project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.