शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित; मानोरा तालुक्यातील शिक्षक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 03:44 PM2019-08-26T15:44:04+5:302019-08-26T15:44:26+5:30

वेतन बिल वित्त विभागात सादर करण्यासाठी लेखी आदेश द्यावे आदी प्रश्न निकाली काढण्याची मागणी शिक्षकांनी केली.

Pending questions; teacher Aggressive in Manora taluka | शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित; मानोरा तालुक्यातील शिक्षक आक्रमक

शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित; मानोरा तालुक्यातील शिक्षक आक्रमक

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : सातव्या वेतन आयोगाचा वेतन फरकाची रक्कम मिळावी, धोकादायक अवस्थेतील शाळा इमारतीची दुरूस्ती करावी यासह विविध प्रलंबित मागण्या निकाली काढण्याची मागणी मानोरा तालुक्यातील शिक्षक संघटनेने गटशिक्षणाधिकाºयांकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली. 
निवेदनानुसार, ७ व्या वेतन आयोगाचा वेतन फरक बिलाचा पहिला हप्ता जुनच्या वेतनासोबत डीसीपीएस धारकांना रोख तर जीपीएफ धारक कर्मचारी यांना जीपीएफ खात्यावर मिळणे शासन निर्णयप्रमाणे आवश्यक आहे. आॅगस्ट महिना संपत येत असतानाही  वेतन फरकाची रक्कम मिळाली नाही, ही रक्कम मिळावी, मानोरा पंचायत समितीमधील लेखी मागणीने अर्ज करणाºया शिक्षकांचे वेतन  खाते स्टेट बँक आॅफ इंडिया येथे उघडण्यासाठी लेखी आदेश द्यावे, आस्थापना लिपीक हे त्यांचे स्थापनेवर अनेकवेळा हजर नसतात, त्यांना तंबी देवुन शिक्षकांची हेळसांड थांबवावी, मानोरा तालुक्यातील अनेक शाळा सध्या धोकादायक स्थितीत आहे. अनुचित प्रकार किंवा अपघात होण्यापुर्वी सर्व शाळांचे स्ट्रक्चरल आॅडीत करावे, शाळेचे विद्युत देयके ग्रामपंचायत कार्यालयातमार्फत भरणेसाठी आपल्या स्तरावर आदेश व्हावे, उर्वरीत व वंचित विद्यार्थ्यांना गणवेश निधी उपलब्ध व्हावा तसेच उर्वरीत १६० रुपये प्रमाणे गणवेश रक्कम मिळावी, प्राथमिक शिक्षकांचे वेतन एक तारखेला होण्यासाठी आस्थापना लिपीक यांना वेळेपुर्वी वेतन बिल वित्त विभागात सादर करण्यासाठी लेखी आदेश द्यावे आदी प्रश्न निकाली काढण्याची मागणी शिक्षकांनी केली. निवेदनावर कृष्णा सोळंके, अरुण जाधव, प्रविण म्हातारमारे, दिलीप अंभोरे, अर्जुन लोंदे, सुधीर काळे, आकाश राठोड, धनंजय ठाकरे, राजेश जिचकार, कैलास ढगे, अमोल भगत, गणेश गवई, विष्णु ठाकरे, निलेश कानडे, रवि ठाक रे ,बालाजी मोटे ,जीवन शिंदे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: Pending questions; teacher Aggressive in Manora taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.