पीक नुकसानाचे पंचनामे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:42 AM2021-03-26T04:42:03+5:302021-03-26T04:42:03+5:30

खेर्डी शिवारात गत चार दिवसांपूर्वी वादळवाºयासह गारपिट आणि अवकाळी पाऊस पडला. त्यात अनेक शेतकºयांच्या शेतामधील गहू, हरभरा, संत्रा, पपई, ...

Pendulum of crop loss pending | पीक नुकसानाचे पंचनामे प्रलंबित

पीक नुकसानाचे पंचनामे प्रलंबित

Next

खेर्डी शिवारात गत चार दिवसांपूर्वी वादळवाºयासह गारपिट आणि अवकाळी पाऊस पडला. त्यात अनेक शेतकºयांच्या शेतामधील गहू, हरभरा, संत्रा, पपई, निंबू, टरबूज, काकडी आदि पिकांचे नुकसान झाले. त्यात रोहन थिटे यांच्या पपई पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संतोष लक्ष्मण केळे यांच्या शेतातील टरबुज काकडी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय मिरची, कांदा उकडलेली हळद, चारा पिके या पिकांचे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीला चार दिवस उलटले तरी प्रशासनाने पीक नुकसानाची पाहणी केली नाही. त्यामुळे शेतकरीवर्गात निराशेचे वातावरण आहे.

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

कोरोना चाचणीवर भर

वाशिम: कार्यालयातील प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. याची अमलबजावणी युद्धपातळीवर केली जात आहे. त्यात कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या अधिकारी, कर्मचाºयांनी तातडीने लस घेण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

----------------------

तुरीचे दर घसरले

वाशिम: गेल्या १५ दिवसांपासून तुरीच्या दरात सतत घसरण सुरू आहे. गुरुवारीही १०० रुपयांची घसरण होऊन बाजारात तुरीचे दर ६७०० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचले होते.

----------------------

सावंगा येथे चार बाधित

वाशिम: तालुक्यात कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर जात आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार गुरुवारी सावंग येथील आणखी ४ व्यक्ती बाधित असल्याचे निदान झाले आहे. त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

^^^^^^^^

३१ वाहनचालकांवर कारवाई

वाशिम: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकाने गुरुवारी ३१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. जिल्हाभरात वाहतूक शाखेकडून ही मोहीम राबविण्यात आली.

-------------------

Web Title: Pendulum of crop loss pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.