५५ वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना पेन्शन लागू व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:12 AM2021-01-08T06:12:00+5:302021-01-08T06:12:00+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय जाधव होते. आमदार अमित झनक, आमदार किरणराव सरनाईक, माधवराव अंभोरे, भूमिपुत्रचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय जाधव होते. आमदार अमित झनक, आमदार किरणराव सरनाईक, माधवराव अंभोरे, भूमिपुत्रचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, राज्य प्रवक्ते डॉ. जितेंद्र गवळी, राज्य उपाध्यक्ष भास्करराव बेंगाळ, राज्य संघटक डॉ. माधव हिवाळे, दत्तराव गोटे, शिवाजी वाटणे, भागवतराव गोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भूमिपुत्र शेतकरी संघटनेने वर्षभरात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेगवेगळी आंदोलने केली. पाच जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मजबूत संघटन उभे केले. विशेषत: सोयाबीन व हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, यासाठी लढा उभा केल्याचे मत यावेळी विष्णुपंत भुतेकर यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी खचून न जाता संकटांशी लढले पाहिजे, असे मत विजय जाधव यांनी नोंदविले. उपस्थित इतर मान्यवरांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, उत्तमराव आरु, डॉ. तृप्ती गवळी, संगीता मार्गे, देव इंगोले, संतोष सुर्वे, स्वप्नील माहुरे, राम बोरकर, श्रीरंग नागरे, नागेश इंगोले, बाळू रोकडे, सचिन काकडे, शिवाजी कढणे, सतीश गंगावणे, शत्रुघ्न अवचार, राम अवचार, जगन अवचार, राजू डांगे, विकास झुंगारे, अंबादास खरात, शंकरराव मुंढे, संजय सदार, अमोल बाजड, पवन खोंडकर, रवी जाधव, शंकर हुंबाड आदिंनी पुढाकार घेतला.