वाशिम तालुक्याची टक्केवारी वाढली!
By admin | Published: May 31, 2017 02:09 AM2017-05-31T02:09:20+5:302017-05-31T02:09:20+5:30
सहा शाळांचा निकाल १०० टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालामध्ये वाशिम तालुक्यात ४०५३ विद्यार्थ्यांपैकी ३७४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी ९२.४५ एवढी आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेत यंदा वाशिम तालुक्यामधून सहा शाळांचा निकाल १०० टक्के एवढा लागला. उर्वरीत कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वाशिम येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय ९७.७२ टक्के, राजस्थान आर्य महाविद्यालय ९५.४८ टक्के, पी.डी. जैन विद्यालय अनसिंग ९०.९० टक्के, जिजामाता विद्यालय अनसिंग ८५.९६ टक्के, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय कोकलगाव ९१.८८ टक्के, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा वाशिम ९८.१८ टक्के, बाकलीवाल कनिष्ठ महाविद्यालय वाशिम ९७.४१ टक्के, श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय तोंडगाव ८५.४१ टक्के, यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय काजळंबा ८७.१३ टक्के, श्री राजेश्वर विद्यालय वांगी ७७.२७ टक्के, परमविर अ. हमीद उर्दू हायस्कुल वाशिम ९४.२८ टक्के, अल्पसंख्यांक उर्दु कॉलेज वाशिम ८८.२३ टक्के, एन.डी. कोल्हे कनिष्ठ महाविद्यालय सावरगाव जिरे ८७.४० टक्के, डॉ. पंजाबराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय हिवरा ९७.०१ टक्के, जागेश्वर कनिष्ठ महाविद्यालय कार्ली ९५.६५ टक्के, शरद पवार कनिष्ठ महाविद्यालय सुपखेला ९४.७३ टक्के, विद्याप्रबोधीनी कनिष्ठ महाविद्यालय उकळी पेन ८२.०५ टक्के, स्व. नामदेवराव राजगुरू विद्यालय धुमका बोराळा ८९.४७ टक्के, रघुनाथ स्वामी कनिष्ठ महाविद्यालय सोयता ७५ टक्के, ज्ञानराज माऊली कनिष्ठ महाविद्यालय तोरणाळा ९८.३५ टक्के, मनोहरराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय कोंडाळा ९६.७४ टक्के, श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय राजगाव ९४.३१ टक्के, विठ्ठल कनिष्ठ महाविद्यालय पार्डी आसरा ८४.१२ टक्के, श्रीराम चरणदास बाबा कनिष्ठ महाविद्यालय फाळेगाव ९०.२७ टक्के, बिरजू पाटील उच्च माध्यमिक विद्यालय वाई ९०.१० टक्के, विठाबाई पसारकर उच्च माध्यमिक विद्यालय केकतउमरा ९८.७१ टक्के, लाल बहादुर शास्त्री विद्यालय काटा ९५.२७ टक्के, मौलाना आझाद उर्दु उच्च माध्यमिक विद्यालय अनसिंग ८८ टक्के, नगर परिषद महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय वाशिम ९०.१६ टक्के, तुळशिराम जाधव उच्च माध्यमिक विद्यालय वाशिम ७४.०७ टक्के, रेखाताई राष्ट्रीय विद्यालय वाशिम ६९.२३ टक्के, उर्दु उच्च माध्यमिक विद्यालय वाशिम ६० टक्के, बांगर कनिष्ठ महाविद्यालय वाशिम ९६.७७ टक्के, नारायणा कनिष्ठ महाविद्यालय वाशिम ९६ टक्के, शांताबाई गोटे कनिष्ठ महाविद्यालय वाशिम ७२.४१ टक्के, सावित्रिबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम ७७.७७ टक्के व जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय अनसिंग ८६.११ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.