वाशिम पोलिस दलातील खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 01:20 PM2019-03-29T13:20:38+5:302019-03-29T13:20:51+5:30

अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेत ‘शरिर सौष्ठव’मध्ये ६५ किलो वजनगटात सुवर्ण पदक प्राप्त करणारे पोलिस कॉन्स्टेबल जगदीश घरडे यांचा गुरूवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात सत्कार करण्यात आला.

The performance of the players of the Washim police team is appreciated! | वाशिम पोलिस दलातील खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद!

वाशिम पोलिस दलातील खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा पोलिस दलातील कर्मचाºयांनी कर्तव्याला न्याय देण्यासोबतच विविध प्रकारच्या खेळांमध्ये केलेली यशस्वी कामगिरी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार येथील जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी काढले. 
जयपूर (राजस्थान) येथे पार पडलेल्या ६७ व्या अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेत ‘शरिर सौष्ठव’मध्ये ६५ किलो वजनगटात सुवर्ण पदक प्राप्त करणारे पोलिस कॉन्स्टेबल जगदीश घरडे यांचा गुरूवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. घरडे यांनी सुवर्ण पदक प्राप्त करण्यासोबतच तामीळनाडू (चेन्नई) येथे २९ ते ३१ मार्च या कालावधीत होणाºया बाराव्या सिनीअर मिस्टर इंडिया अ‍ॅन्ड मेन्स नॅशनल स्पर्धेत सहभागातील पात्रता सिद्ध केली आहे. त्यापुढे होणाºया वल्ड पोलिस फायर गेम चायनासाठी देखील घरडे यांची निवड व्हावी, अशी सदिच्छा याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास अपर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, पोलिस उपअधिक्षक (गृह) किरण धात्रक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे, राखीव पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर, क्रीडा प्रमुख पोलिस हवालदार दिलीप घोडाम आदिंची उपस्थिती होती. या कार्यक्रमात पोलिस कॉन्स्टेबल घरडे यांना बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले.

Web Title: The performance of the players of the Washim police team is appreciated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.